atrangire

बॉलिवूडमधील दिग्दर्शक आनंद एल.राय यांना कोरोनाची लागण झाली आहे. ट्विटरवर एक पोस्ट शेअर करत त्यांनी याबद्दल माहिती दिली. सध्या त्यांना क्वारंटाइन करण्यात आलय. आनंद एल. राय त्यांच्या आगामी अतरंगी रे या चित्रपटाच्या चित्रीकरणामध्ये व्यस्त होते. मात्र, या काळातच त्यांना करोनाची लागण झाली. त्यानंतर ते क्वारंटाइन झाले आहेत.

“माझे करोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहे. मात्र, माझ्यात करोनाची कोणतीच लक्षणं नव्हती. सध्या मी क्वारंटाइन आहे. तसंच सगळ्या नियमांचं नीट पालन करत आहे. गेल्या काही दिवसांमध्ये जे लोक माझ्या संपर्कात आले होते. त्यांनी कृपया क्वारंटाइन रहा आणि नियमांचं पालन करा”, अशी पोस्ट आनंद राय यांनी केली आहे.

View this post on Instagram

A post shared by Aanand L Rai (@aanandlrai)

दरम्यान, आनंद एल. राय यांच्या आगामी ‘अतरंगी रे’ या चित्रपटात अभिनेता अक्षय कुमार, सारा अली खान आणि दाक्षिणात्य सुपरस्टार धनुष ही कलाकार मंडळी झळकणार आहेत.

View this post on Instagram

A post shared by Aanand L Rai (@aanandlrai)