बॅालिवूडमधील आणखी एका कलाकाराचं निधन, ‘द लास्ट शो’साठी एक दिवस आधीच मिळाला राष्ट्रीय पुरस्कार

बॉलिवूडचे ज्येष्ठ संपादक संजय वर्मा यांचे निधन झाले. मृत्यूच्या एक दिवस आधी त्यांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाला.

  काही दिवसांपुर्वी बॉलिवूडमधील आर्ट डायरेक्टर नितीन देसाई (Nitin Desai Suicide) यांनी आत्महत्या केली. त्यांच्या जाण्याचे हिंदी सिनेसृष्टीने एक चांगला कलाकार गमावला. या घटनेला महिना उलटत नाही तोच आता पुन्हा एका बॉलिवूड कलाकराचं निधन झालं आहे.  बॉलिवूडचे लोकप्रिय चित्रपट संपादक संजय वर्मा यांचे निधन (Sanjay Varma Death) झाले. सध्या त्यांच्या मृत्यूचे कारण समोर आलेले नाही. मात्र त्यांच्या जाण्याने चित्रपटसृष्टीला मोठा धक्का बसला आहे. संजय बॉलीवूडच्या प्रसिद्ध संपादकांपैकी एक होते, ज्यांनी अनेक सुपरहिट चित्रपटांच एडिटींग केलं होतं. राकेश रोशनच्या अनेक चित्रपटांमध्ये त्यांनी काम केलं आहे. यासोबतच त्यांनी ‘कोई मिल गया’ या सुपरहिट चित्रपटाचे एडिटिंगही केले आणि अनेक पुरस्कारही जिंकले.

  एक दिवसाआधी मिळाला राष्ट्रीय पुरस्कार

  मृत्यूच्या एक दिवस आधी संजय यांना त्यांच्या शेवटच्या गुजराती चित्रपट ‘द लास्ट शो’साठी 69 वा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. हा चित्रपट 2021 साली प्रदर्शित झाला होता आणि ऑस्करसाठीही तो शॉर्टलिस्ट झाला होता. एवढेच नाही तर त्यांनी त्यांच्या करिअरमध्ये 52 हून अधिक चित्रपटांचे एडिटींग केलं होतं, त्यापैकी बहुतांश चित्रपट सुपरहिट राहिले.

  ‘या’ चित्रपटांमध्ये संजय वर्मा यांनी काम केले आहे

  संजय हृतिक रोशनच्या वडिलांच्या फार जवळ होते. त्यांनी राकेशचा चित्रपट ‘खून भरी मांग’, ‘कोई मिल गया’, ‘कहो ना प्यार है’ अशा अनेक चित्रपटांचे ऐडिटींग केले आहे. याशिवाय त्यांनी शाहरुख खान आणि सलमान खानचा ‘करण अर्जुन’ चित्रपटही एडिटींग केलं होतं. दिल वाले दुल्हनिया ले जायेंगे या चित्रपटाच्या फायनल लूकच्या मागेही संजय वर्मा यांचं परिश्रम होतं.

  संजय वर्मा ‘या ‘मोठ्या चित्रपटाचं केलंय काम

  संजय वर्मा यांच्या कामाबद्दल सांगायचे तर, त्यांनी हृतिक रोशनचे वडील राकेश रोशन यांच्या अनेक चित्रपटांचे एडिटींग केलं आहे. यासोबतच त्यांनी कोई मिल गया सारख्या चित्रपटांचे एडिटींग केलं असून त्यासाठी त्यांना पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले आहे. इतकेच नाही तर लास्ट शो या चित्रपटाचे संपादनही संजय वर्मा यांनी केले आहे. ज्याला नुकतेच 69 व्या राष्ट्रीय पुरस्काराने गौरविण्यात आले.