सिनेप्रेमींसाठी खुशखबर! मुंबईतील ‘या’ मेट्रो स्थानकाखाली उभारलं जाणार ‘बॉलिवूड थीम पार्क’

मुंबईतील येलो लाईन मेट्रो (2B)या मार्गावर 20 स्थानके आहेत. ही मुंबईतील सर्वात लांब मेट्रो मार्गांपैकी एक आहे. आता याच मार्गावर 'बॉलिवूड थीम पार्क' उभारलं जाणार आहे.

    सिनेप्रेमींसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. भारतीय चित्रपटसृष्टीचा मागील 100 वर्षाचा प्रवास लवकरच सिनेप्रेमींना पाहता येणार आहे. मुंबईतील वांद्रे पश्चिम येथील मेट्रो लाईन खाली बॅालिवूड थीमवर आधारित पार्क (Bollywood Theme Park) उभारला जाणार आहे. एमएमआरडीए मार्फत मेट्रो लाईन 2 बीच्या खाली ईएसआयसी नगर ते वांद्रे दरम्यान 7 स्टेशन दरम्यान हा उभा उभारण्यात येईल.  जवळपास 300 खांब आणि त्यामधील जागे मध्ये  शिल्प, एलईडी दिवे, डिजिटल आणि अद्यावात तंत्रज्ञानाचा वापर करुन हा बॉलीवूड थिम तयार होणर आहे. आशिष शेलार (Ashish Shelar) यांच्या संकल्पनेतून या पार्कची उभारणी करण्यात येत आहे.

    आशिष शेलार यांनी दिली माहिती

    आशिष शेलार पुढे म्हणाले,”दादासाहेब फाळकेंनी (Dadasaheb Phalke) ज्या काळात अधिराज्य गाजवलं तो काळ, त्यानंतर 1913 ते 1939 पर्यंत, त्यानंतर 1970 पर्यंत आणि नंतर 2024 पर्यंत फिल्म इंडस्ट्रीत योगदान असलेले स्टुडिओ, दादासाहेब फाळके पुरस्कार विजेते या सगळ्यांचा यामध्ये समावेश असेल. सोबतच ४ प्रमोशनल बेज्ज ठेवण्यात आले आहेत. खर्च मोठा होणार आहे. त्यात एमएमआरडीएकडून उत्पन्नाचे स्त्रोतदेखील निर्माण केले जातील. आंतरराष्ट्रीय स्तरावरचं सौंदर्य निर्माण करण्याचा प्रयत्न आहे. प्रोडक्शन हाऊसेस, कॅफे, प्रमोशनल सेंटरचीदेखील उभारणी होताना दिसेल”.