120 कोटींच्या ‘अतरंगी रे’ ची Disney+ hotstar ला 200 कोटींना विक्री, रिलीजपूर्वीच खिलाडी अक्षय कुमारच्या चित्रपटाची सुपरहिट कमाई

सारा अली खान, अक्षय कुमार आणि धनुष यांच्या अतरंगी रे या चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रसिद्ध झालाय. ही एक लव्ह ट्रँगल स्टोरी आहे, जी चित्रपटात अतिशय अनोख्या पद्धतीने दाखवण्यात आलीय. अतरंगी रे ख्रिसमसच्या मुहूर्तावर OTT प्लॅटफॉर्म Disney Plus Hotstar वर प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला असून, सोशल मीडियावर त्याला चाहत्यांची चांगलीच पसंती मिळत आहे. बऱ्याच दिवसांनंतर चाहत्यांना एक नवीन जोडी नव्या रुपात पाहायला मिळणार असून, त्यासाठी प्रेक्षकांची उत्कंठाही शिगेला पोहोचलीय.

    सूर्यवंशीच्या चित्रपटातील धमाकेदार एंट्रीनंतर अक्षय कुमारने ओटीटीवरही आपल्या चित्रपटांचा सिलसीला सुरु ठेवला आहे. डिस्ने प्लस हॉटस्टारवर 24 डिसेंबर रोजी प्रदर्शित होणाऱ्या अतरंगी रे या त्याच्या नवीन चित्रपटाला OTT वरील आतापर्यंतची सर्वात मोठी किंमत मिळाली आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार, हॉटस्टारने अतरंगी रे हा अक्षयचा नविन चित्रपट 200 कोटी रुपयांना विकत घेतला आहे. 200 कोटी OTT रिलीजसाठी आतापर्यंतची बॉलिवूडची सर्वात मोठी डील आहे.

    सारा अली खान, अक्षय कुमार आणि धनुष यांच्या अतरंगी रे या चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रसिद्ध झालाय. ही एक लव्ह ट्रँगल स्टोरी आहे, जी चित्रपटात अतिशय अनोख्या पद्धतीने दाखवण्यात आलीय. अतरंगी रे ख्रिसमसच्या मुहूर्तावर OTT प्लॅटफॉर्म Disney Plus Hotstar वर प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला असून, सोशल मीडियावर त्याला चाहत्यांची चांगलीच पसंती मिळत आहे. बऱ्याच दिवसांनंतर चाहत्यांना एक नवीन जोडी नव्या रुपात पाहायला मिळणार असून, त्यासाठी प्रेक्षकांची उत्कंठाही शिगेला पोहोचलीय.

    ३ मिनिटे आठ सेकंदाच्या ‘अतरंगी रे’ चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये सारा आणि धनुषने अनेकांची मने जिंकली आहेत. ट्रेलरच्या सुरुवातीला धनुषचे अपहरण करुन साराशी लग्न करण्यासाठी आणण्यात आल्याचे दाखवले आहे. पण सारा लग्नाला तयार नसते. साराचे लग्न कुटुंबीय जबदरस्तीने धनुषशी लावून देतात. त्यानंतर सारा आणि धनुष दिल्लीला जातात. तेव्हा त्यांच्यामध्ये जवळीक निर्माण होते आणि त्याच वेळी अक्षय कुमारची एण्ट्री होते. साराचे अक्षयवर प्रचंड प्रेम असते. एकंदरीत ट्रेलर पाहता चाहत्यांमध्ये चित्रपटाची उत्सुकता लागली आहे.

    दरम्यान, अतरंगीला मिळालेल्या डीलवरून हे स्पष्ट आहे की थिएटर्स सुरू झाल्यानंतर, OTT प्लॅटफॉर्म प्रेक्षकांना आकर्षित करण्यासाठी मोठ्या स्टार्सचे चित्रपट खरेदी करण्यास तयार आहेत. त्यामुळे अक्षयचा अतरंगी रे कलेक्शनच्या बाबतीत रिलीज होण्यापूर्वीच बॉक्स ऑफिसच्या 200 कोटींच्या कलेक्शन क्लबमध्ये सामील झाला आहे. त्यामुळे अतरंगी रे रिलीज पूर्वीच सुपरहिट ठरला आहे.