52 lakh horse, 9 lakh cat; Sukesh Chandrasekhar Gives Billions To Jacqueline Fernandes

200 कोटी रुपयांची खंडणी वसुली प्रकरणात ईडीने कथित ठग सुकेश चंद्रशेखर, त्याची पत्नी अभिनेत्री लीना मारिया पॉल आणि अन्य 6 जणांविरोधात मनी लाँड्रिंग प्रकरणात 7000 पानांचे आरोपपत्र सादर केले आहे. या आरोपपत्रात ईडीने धक्कादायक दावे केले असून दिल्लीतील पटियाळा हाऊस कोर्टात हे आरोपपत्र सादर करण्यात आले आहे. या आरोपपत्रात महाठग सुकेश चंद्रशेखरने बॉलिवुड अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिस आणि नोरा फतेहीला कोट्यवधी रुपयांचे गिफ्ट दिल्याचाही उल्लेख करण्यात आला आहे(52 lakh horse, 9 lakh cat; Sukesh Chandrasekhar Gives Billions To Jacqueline Fernandes).

    दिल्ली : 200 कोटी रुपयांची खंडणी वसुली प्रकरणात ईडीने कथित ठग सुकेश चंद्रशेखर, त्याची पत्नी अभिनेत्री लीना मारिया पॉल आणि अन्य 6 जणांविरोधात मनी लाँड्रिंग प्रकरणात 7000 पानांचे आरोपपत्र सादर केले आहे. या आरोपपत्रात ईडीने धक्कादायक दावे केले असून दिल्लीतील पटियाळा हाऊस कोर्टात हे आरोपपत्र सादर करण्यात आले आहे. या आरोपपत्रात महाठग सुकेश चंद्रशेखरने बॉलिवुड अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिस आणि नोरा फतेहीला कोट्यवधी रुपयांचे गिफ्ट दिल्याचाही उल्लेख करण्यात आला आहे(52 lakh horse, 9 lakh cat; Sukesh Chandrasekhar Gives Billions To Jacqueline Fernandes).

    सुकेशने जॅकलीनला 10 कोटींचे गिफ्ट दिले. यात 52 लाखांचा घोडा आणि 9 लाखांच्या फारशी मांजरीचाही उल्लेख करण्यात आला आहे. नोरा फतेहीलाही दिलेल्या कोट्यवधींच्या गिफ्टचा आरोपपत्रात उल्लेख आहे.महागड्या गिफ्ट्समध्ये दागिने, हिरेजडित दागिणे, क्रॉकरी, 4 फारशी मांजरी (एका मांजरीची किंमत जवळपास 9 लाख रुपये). याशिवाय लाखो रुपये किमतीच्या एका घोड्याचाही समावेश आहे.

    सुकेश ज्यावेळी जेलमध्ये होता त्यावेळी तो जॅकलीनसोबत संवादही साधत होता. ज्यावेळी सुकेश जामिनावर सुटला त्यावेळी त्याने चेन्नईसाठी, तर मुंबई ते दिल्लीसाठी जॅकलीनसाठी एक चार्टर्ड विमान बुक केले होते. आरोपपत्रातील दाव्यानुसार चेन्नईतील एका हॉटेलमध्ये या दोघांनीही एकत्रित मुक्काम केला होता.

    जामिनावर असताना सुकेशने खासगी जेटमधून हवाई प्रवासावरच 8 कोटी रुपये खर्च केले होते. सुकेशने जॅकलीनच्या भाऊ व बहिणालाही मोठी रक्कम पाठविली होती. या रकमेबाबत ईडीने जॅकलीनचे निकटवर्तीय सहकारी आणि कर्मचाऱ्यांचीही चौकशी केली होती. दुसरीकडे, नोरा फतेहीला सुकेशने एक बीएमडबल्यू कार आणि आयफोन गिफ्ट केला होता याची एकत्रित किंमत एक कोटींपेक्षा जास्त होती.

    ईडीने दाखल केलेल्या आरोपपत्रात जॅकलीनसह नोरा फतेहीचाही उल्लेख केला आहे. या प्रकरणात ईडीने दोघींचीही चौकशी करण्यासह जॅकलीनच्या निकटवर्तीयांचीही चौकशी केली होती. आरोपपत्रानुसार चंद्रशेखर आणि जॅकलीनने या वर्षी जानेवारी महिन्यातच चर्चा करणे सुरू केल होते आणि त्यानंतर सुकेशने तिला भेटवस्तू पाठविल्या, असे आरोपपत्रात म्हटले आहे.