फरहान आणि शिबानीच्या लग्नाचा मुहु्र्त ठरला! “या” दिवशी अडकणार विवाहबंधनात

गेल्या अनेक दिवसापासून फरहान अख्तर आणि शिबानी दांडेकर या दोघांच्या लग्नाची चर्चा सोशल मीडियावर सुरु आहे. अखेर या सगळ्या चर्चांना पुर्णविराम देत दोघही लग्न करत आहेत. मीडिया रिपोर्टनुसार, अभिनेता फरहान अख्तर आणि मॉडेल शिबानी दांडेकर येत्या 21 फेब्रुवारीला मुंबईमध्ये विवाह नोंदणी करणार आहे.

    बॉलिवूडमध्ये (Bollywood) सध्या लग्नासराईचा सिझन सुरू आहे. अंकिता लोंखडे-विकी जैन, विकी कौशल-कैटरिना कैफ यांच्यांनंतर आता बॅालिवूडंच आणखी एक डॅशिंग कपल आता लग्नपबंधनात अडकणार आहे. अभिनेता फरहान अख्तर (Farhan Akhtar) आणि शिबानी दांडेकर (Shibani Dandekar) यांनी आपल्या अनेक दिवसाच्या नात्याला लग्नबंधनात बांधण्याचा निर्णय घेतला आहे. मीडिया रिपोर्टनुसार, हे जोडपं पुढच्या महिन्यात मुंबईमध्ये विवाह नोंदणी करणार आहे.गेल्या अनेक दिवसापासून फरहान अख्तर आणि शिबानी दांडेकर या दोघांच्या लग्नाची चर्चा सोशल मीडियावर सुरु आहे. अखेर या सगळ्या चर्चांना पुर्णविराम देत दोघही लग्न करत आहेत. मीडिया रिपोर्टनुसार, अभिनेता फरहान अख्तर आणि मॉडेल शिबानी दांडेकर येत्या 21 फेब्रुवारीला मुंबईमध्ये विवाह नोंदणी करणार असल्याची माहिती समोर आली आहे. इतर सेलिब्रिटी जोडप्यांप्रमाने या कपलनेही शाही लग्न करण्याचा विचार करत होते. मात्र राज्यातील कोरोनाची परिस्थिती बघता त्यांनी हा विचार नोंदणी पद्धतीने विवाह करण्याचं ठरवलं.

    फरहान अख्तर आणि शिबानी दांडेकर 2018 पासून एकमेकांना डेट करत आहेत. फरहानचे हे दुसरे लग्न असेल. अभिनेत्याचे पहिले लग्न अधुना भाबानीसोबत झाले होते. 2000 मध्ये त्यांनी लग्न केले. दोघांना दोन मुले आहेत. फरहान आणि अधुना २०१६ मध्ये वेगळे झाले आणि त्यानंतर २०१७ मध्ये दोघांनी परस्पर संमतीने घटस्फोट घेतला.