शेरशाह ते बॉर्डर, ‘हे’ आहेत भारतीय लष्करावर आधारित चित्रपट!

आर्मी डे च्या निमित्ताने बघुयात भारतीय ल्ष्करावर आधारित चित्रपट. या चित्रपटात शूर सैनिकांच्या शौर्याची कहाणी दाखवण्यात आली आहे. या चित्रपटांना प्रेक्षकांनीची मोठ्या प्रमाणावर पंसती मिळाली होती.

  बॉलीवूडमध्ये भारतीय लष्करावर आधारित अनेक चित्रपट बनवले आहेत. जवानांच्या शौर्यापासून ते त्यांच्या बलिदानापर्यंत, हिंदी चित्रपटसृष्टीने भारतीय लष्कराच्या धैर्याची आणि संघर्षाची कहाणी घराघरात पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. आर्मी डेच्या निमित्ताने आम्ही तुम्हाला शूर सैनिकांच्या शौर्याची कहाणी दाखवणाऱ्या चित्रपटांबद्दल सांगणार आहोत.

  बॉर्डर
  जे.पी. दत्ता दिग्दर्शित मल्टीस्टारर चित्रपटात वेगवेगळ्या लष्करी अधिकारी आणि सैनिकांच्या कथा दाखविण्यात आली आहे. चित्रपटातील अनेक दृश्ये १९७१ च्या भारत-पाकिस्तान युद्धात तोलेलिंगच्या लढाई दरम्यान घडलेल्या सत्य घटनांपासून प्रेरित असल्याचं म्हटलं जातं. 1997 मध्ये आलेल्या या चित्रपटात सनी देओल, सुनील शेट्टी, अक्षय खन्ना, जॅकी श्रॉफ आणि कुलभूषण खरबंदा यांसारख्या सुप्रसिद्ध कलाकारांनी काम केलं होतं. ‘बॉर्डर’ चित्रपटाला अनेक फिल्मफेअर पुरस्कार आणि तीन राष्ट्रीय पुरस्कारही मिळाले आहेत.
  एलओसी कारगिल
  2003 मध्ये रिलीज झालेला ‘एलओसी: कारगिल’ हा चित्रपट ऑपरेशन विजय 1999 आणि तोलेलिंगच्या लढाईवर आधारित आहे. जेपी दत्ता दिग्दर्शित या चित्रपटात संजय दत्त, अजय देवगण आणि अभिषेक बच्चन यांनी भूमिका केल्या होत्या. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील कारगिल युद्धावर आधारित या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर समीक्षक आणि प्रेक्षकांकडून संमिश्र प्रतिसाद मिळाला.
  उरी : सर्जिकल स्ट्राईक
  २०१६ मध्ये उरी हल्ल्यानंतर पाकिस्तानवर करण्यात आलेल्या सर्जिकल स्ट्राईकवर आधारित हा चित्रपट २०१९ मध्ये प्रदर्शित झाला होता. ‘उरी : सर्जिकल स्ट्राइक’ या चित्रपटात अभिनेता विकी कौशलने दमदार अभिनय केला आहे. रिपोर्ट्सनुसार, या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जवळपास 342 कोटींची कमाई केली होती. त्यामुळे हा चित्रपट सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांच्या यादीत सामील झाला आहे.
  शेरशाह
  आर्मी कॅप्टन विक्रम बत्रा यांच्या जीवनावर आधारित या चित्रपटात सिद्धार्थ मल्होत्रा ​आणि कियारा अडवाणी मुख्य भूमिकेत आहेत. 1999 च्या कारगिल युद्धात एका सैनिकाला वाचवताना आपल्या प्राणाची आहुती देणारे कॅप्टन विक्रम यांना मरणोत्तर परमवीर चक्र प्रदान करण्यात आले. या चित्रपटाची निर्मिती करण जोहरने केली होती.