एकही चित्रपट सोबत नाही, मग विकी-कतरिना प्रेमात कसे पडले? पठ्ठ्यानं सलमान खानसमोरच कॅटला केले होतं प्रपोज, वाचा दोघांची प्यारवाली लव्ह स्टोरी

2019 मध्ये स्टार स्क्रीन अवॉर्ड्समध्ये विकीने जाहीरपणे कतरिनासमोर लग्नाचा प्रस्ताव ठेवला. विकी म्हणाला होता की, मी तुझा खूप मोठा फॅन आहे, लग्नाचा सिझन सुरू आहे, तू पण विकी कौशल शोधून त्याच्याशी लग्न का करत नाहीस. त्यानंतर विकीने थेट कतरिनाला विचारलं की तू माझ्याशी लग्न करशील. यावर अभिनेत्री म्हणाली - माझ्यात हिम्मत नाही. आश्‍चर्याची गोष्ट म्हणजे हा सर्व प्रकार सलमान खानच्या उपस्थितीत घडत असताना त्याचे एक्स्प्रेशन पाहण्यासारखे होते. यावेळी, अवॉर्ड नाईटमध्ये अभिनेता आणि होस्टमधील विनोद म्हणून सर्वांनी त्याकडे दुर्लक्ष केले होते, परंतु आता दोघेही खरोखर एकमेकांचे बनले आहेत.

  अभिनेत्री कतरिना कैफ आणि विकी कौशल हे सध्या बॉलीवूडमधील सर्वाधिक चर्चेत असलेले कपल आहेत. दोघे 9 डिसेंबरला राजस्थानच्या हॉटेल सिक्स सेन्सेस बरवारा फोर्टमध्ये लग्न करणार आहेत. मात्र, दोघांनीही या लग्नाबाबत कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही. कतरिना आणि विकीची लव्हस्टोरी खूप रंजक आहे. चला तर जाणून घेऊया त्यांच्या प्रेमकहाणीबद्दल:-

  करण जोहरने भिडवला टाका

  विकी आणि कतरिनाची जोडी बनवण्यात करण जोहरचा खूप महत्त्वाचा वाटा आहे. ‘कॉफी विथ करण’ या तिच्या टॉक शोमध्ये जेव्हा करणने कतरिनाला विचारले की तिला पुढे कोणासोबत काम करायला आवडेल, तेव्हा कतरिनाने उत्तरात विकीचे नाव घेतले. जेव्हा करणने विकीला हे सांगितले तेव्हा ते ऐकून तो हृदयावर हात ठेवून ‘बेशुद्ध’ होण्याची एॅक्टींग केली.

  पठ्ठ्यानं सलमान खानसमोरच कॅटला केले प्रपोज

  त्यानंतर 2019 मध्ये स्टार स्क्रीन अवॉर्ड्समध्ये विकीने जाहीरपणे कतरिनासमोर लग्नाचा प्रस्ताव ठेवला. विकी म्हणाला होता की, मी तुझा खूप मोठा फॅन आहे, लग्नाचा सिझन सुरू आहे, तू पण विकी कौशल शोधून त्याच्याशी लग्न का करत नाहीस. त्यानंतर विकीने थेट कतरिनाला विचारलं की तू माझ्याशी लग्न करशील. यावर अभिनेत्री म्हणाली – माझ्यात हिम्मत नाही.

  आश्‍चर्याची गोष्ट म्हणजे हा सर्व प्रकार सलमान खानच्या उपस्थितीत घडत असताना त्याचे एक्स्प्रेशन पाहण्यासारखे होते. यावेळी, अवॉर्ड नाईटमध्ये अभिनेता आणि होस्टमधील विनोद म्हणून सर्वांनी त्याकडे दुर्लक्ष केले होते, परंतु आता दोघेही खरोखर एकमेकांचे बनले आहेत.

  हाच तो क्षण जेव्हा विकीने सलमान खान समोर कॅटला प्रपोज केलं