
मुंबईतील प्रसिद्ध दांडिया क्वीन फाल्गुनी पाठकच्या ‘गरबा नाईट’चे पास खरेदी करण्याच्या प्रयत्नात असलेल्या १५६ तरुणांना सव्वापाच लाख रुपये गमवावे लागले आहेत.
फाल्गुनी पाठक : आजपासून नवरात्री महोत्सवाला सुरुवात झाली आहे. अनेक ठिकाणी मोठमोठ्या गरबा नाईट्सचे आयोजन केले जाते. याचदरम्यान गरबा क्वीन’ फाल्गुनी पाठकची नवरात्रोत्सवात चांगलीच क्रेझ आहे. फाल्गुनीने ‘ता-थैया’ नावाचा स्टेज बँड सुरू केला आहे. भारतासह परदेशातही या बँडचे परफॉर्मन्स होतात. फाल्गुनीच्या दांडिया मुंबईत खूपच लोकप्रिय आहेत. आजपासून नवरात्रोत्सवाला सुरुवात झाली आहे. अशातच फाल्गुनी पाठकच्या दांडियाच्या पासेसचे आमिष दाखवून १५६ तरुणांची फसवणूक झाली आहे. मुंबईतील प्रसिद्ध दांडिया क्वीन फाल्गुनी पाठकच्या ‘गरबा नाईट’चे पास खरेदी करण्याच्या प्रयत्नात असलेल्या १५६ तरुणांना सव्वापाच लाख रुपये गमवावे लागले आहेत. आरोपीने स्वस्तात पास देण्याचे आमिष दाखवून या तरुणांची फसवणूक केली असून याप्रकरणी या तरूणांनी मुंबई पोलिसांकडे तक्रार केली आहे.
बोरिवली (पश्चिम) येथील फाल्गुनी पाठकच्या कार्यक्रमाचा अधिकृत विक्रेता असल्याचा दावा करणारा विशाल शाह स्वस्तात पासेस देत असत्याची माहिती कांदिवलीतील एका तरूणाला मिळाली. शाहकडून या कार्यक्रमाचा पास ४,५०० रुपयांऐवजी ३,३०० रुपयांना मिळणार असल्याचे तक्रारदाराला समजले. त्यामुळे तक्रारदार तरूण व त्याचे मित्र पास खरेदी करण्यासाठी तयार झाले. त्यांनी इतर मित्रांनाही विचारणा केली त्यानंतर अखेर तक्रारदारासह १५६ जण पास खरेदी करण्यास तयार झाले. त्यानुसार तक्रारदार आणि त्याच्या दोन मित्रांनी सर्वांकडून रोख रक्कम गोळा केली. शहाच्या सूचनेनुसार तिघे तरुण त्या ठिकाणी पोहोचले आणि त्यांनी एका व्यक्तीकडे पैसे दिले. नंतर शहाने त्यांना योगी नगर येथील पत्ता दिला आणि तेथे पोहोचून पास घेण्यास सांगितले. तिघेही मित्र योगी नगर येथे पोहोचले असता त्यांना सांगितलेली इमारत सापडलीच नाही. ‘गरबा क्वीन’ फाल्गुनी पाठकने आपल्या संस्कृतीला एक नवी ओळख मिळवून दिली आहे. गरबा प्रकार तिने सातासमुद्रापार पोहोचवला आहे. केसरीयो रंग, ओढणी ओढू के उडी उडी जाये, वादघडी वारसी, राधा ने श्याम, परी हूँ में, यांसारखी तिची अनेक गरबा गाणी प्रसिद्ध आहेत.