लाईव्ह कॉन्सर्टमध्ये सुनिधी चौहानवर फेकली बाटली, व्हिडिओ व्हायरल; लोकांनी सोशल मिडीयावर व्यक्त केला संताप

गायिका सुनिधी चौहानच्या लाइव्ह कॉन्सर्टचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एक व्यक्ती त्याच्यावर पाण्याची बाटली फेकताना दिसत आहे. हा व्हिडीओ व्हायरल होताच लोकं प्रचंड संताप व्यक्त करताना दिसत आहे.

    गेल्या काही दिवसात शोमध्ये कलाकारांसोबत चाहत्यांकडून गैरवर्तन करण्याच्या घटना उघडकीस आल्या आहेत. काही दिवसापुर्वी गायक अरिजीत सिंगसोबतही लाईव्ह शो मध्ये एका चाहत्याकडून गैरवर्तन करण्यात आलं होत. आता बॉलिवूडची प्रसिद्ध गायिका सुनिधी चौहान (Sunidhi Chauhan) सोबतही तसाच काहीसा प्रकार घडला आहे. नुकतीच सुनिधी डेहराडूनमधील एका कॉलेजमध्ये परफॉर्म करण्यासाठी आली होती आणि लाइव्ह कॉन्सर्टदरम्यान तिच्यावर बाटली फेकण्यात आली होती. यासंबंधीचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर सुनिधीसोबत असं  कृत्य करणाऱ्या व्यक्तीवर लोक संतापले आहेत. या दरम्यान सुनिधीनं तिचं गाणं चालू ठेवलं होतं.

    काय म्हणाली सुनिधी चौहान?

    लाईव्ह कॉन्सर्टमध्ये बाटली फेकणाऱ्या व्यक्तीला सुनिधी चौहानने विचारले, काय होत आहे, बाटली फेकून काय होईल, शो बंद होईल का, तुम्हा सर्वांना हे हवे आहे का? सुनिधीचे बोलणे ऐकताच तेथे उपस्थित असलेले लोक जोरजोरात नको-नाही ओरडू लागले. व्हिडिओ व्हायरल होताच, चाहत्यांनी सुनिधीचे कौतुक केले की त्यांनी परिस्थिती हुशारीने हाताळली आणि ते सुद्धा स्टेजवरून न जाता.

    नेटकऱ्यांनी व्यक्त केल संताप

    एका युझरने लिहिले – लोक खूप उद्धट आहेत पण ती चांगली आहे की तिने प्रतिक्रिया दिली नाही. दुसऱ्याने लिहिले – लक्ष वेधण्यासाठी तिच्यावर बाटली फेकणे ही चांगली गोष्ट नाही. सुनिधीच्या समर्थनार्थ एकाने लिहिले- लाज वाटते, एका दिग्गज कलाकाराचा असा अपमान, अशा प्रेक्षकांची लाज वाटते. आणि तरीही त्याच्या शालीनतेला सलाम.