जवान चित्रपटासमोर विकी आणि शिल्पाच्या चित्रपटाचा गल्ला रिकामा, जाणून घ्या पहिल्या दिवशी कलेक्शन…

आता विकी द ग्रेट इंडियन फॅमिली या चित्रपटाद्वारे पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला आला. या चित्रपटाबद्दल बोलायचं झालं तर विकीने या चित्रपटाद्वारे एक संदेश दिला आहे.

    द ग्रेट इंडियन फॅमिली – सुखी : मागील बऱ्याच दिवसांपासून जवान चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. म्हणायला गेलं तर शाहरुखचा जवान चित्रपट बॉक्स ऑफिसवर राज्य करत आहे. हा चित्रपट प्रदर्शित होऊन बरेच दिवस झाले त्याचबरोबर या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई केली आणि अजूनही सुरूच आहे. या चित्रपटाने जगभरामध्ये या चित्रपटाच्या कमाईचा आकडा ९३८ कोटींच्या पुढे गेला आहे तर या चित्रपटाने भारतामध्ये ६३२.२५ कोटींचा गल्ला जमवला आहे. जवान चित्रपटाने अनेक रेकॉर्ड मोडले आहेत त्याचबरोबर इतक्या दिवसांनंतर बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाला दोन चित्रपटाला धडक दिली आहे.

    चित्रपटगृहांमध्ये या आठवड्यात ‘द ग्रेट इंडियन फॅमिली’ आणि ‘सुखी’ या चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर एंट्री मारली आहे. मात्र पहिल्याच दिवशी या चित्रपटांची कमाई खूपच निराशाजनक आहे. अभिनेता विकी कौशलने जरा हटके जरा बचके चित्रपटाने प्रेक्षकांना वेड लावलं होतं. तो आपल्या अभिनयाने विनोदी भूमिका असो किंवा गंभीर भूमिका प्रत्येक भूमिका उत्तमरित्या पार पाडतो. आता विकी द ग्रेट इंडियन फॅमिली या चित्रपटाद्वारे पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला आला. या चित्रपटाबद्दल बोलायचं झालं तर विकीने या चित्रपटाद्वारे एक संदेश दिला आहे. मात्र प्रेक्षकांना हा चित्रपट काही खास आवडला नसल्याचं दिसत आहे. शाहरुख खानच्या जवानासमोर विकीचा चित्रपट काही खास कमाल करू शकलेला नाही. द ग्रेट इंडियन फॅमिली च्या पहिल्या दिवसाचे कलेक्शन समोर आले आहे.

    या चित्रपटामध्ये विकी कौशल आणि मानुषी छिल्लर यांच्या प्रमुख भुमिका असलेल्या ‘द ग्रेट इंडियन फॅमिली’ या चित्रपटाने Sacknilk नुसार, शुक्रवारी फक्त १.४० कोटींची कमाई केली आहे. मात्र वीकेंडला या चित्रपटाच्या कमाई वाढ होईल अशी आशा व्यक्त केली जात आहे. द ग्रेट इंडियन फॅमिलीचे दिग्दर्शन विजय कृष्ण आचार्य यांनी केले आहे. या चित्रपटात विकी कौशलसोबत मानुषी छिल्लर, कुमुद मिश्रा, मनोज पाहवा आणि यशपाल शर्मा महत्त्वाच्या भूमिकेत दिसत आहेत. तर शिल्पा शेट्टीच्या ‘सुखी’ या चित्रपटाबद्दल बोलायचं झालं तर मोठया ब्रेकनंतर शिल्पा मोठ्या पडद्यावर परतली मात्र तिच्या चित्रपटाने काही खास कमाल केलेली नाही. Sacknilk च्या मते, ‘सुखी’ने रिलीजच्या पहिल्या दिवशी केवळ ३० लाख रुपयांचीच कमाई केली आहे.