liger

बॉक्सिंग लेजंड माइक टायसन(Mike Tyson Bollywood Debut) बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहेत. करण जोहरच्या(karan Johar) ‘लायगर - साला क्रॉस ब्रीड’(Mike Tyson In Liger Movie) या चित्रपटामध्ये माइक टायसन काम करणार आहेत.

    बॉलिवूडमधून एक मोठी बातमी(Bollywood News) समोर आली आहे. बॉक्सिंग लेजंड माइक टायसन(Mike Tyson Bollywood Debut) बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहेत. करण जोहरच्या(karan Johar) ‘लायगर – साला क्रॉस ब्रीड’(Mike Tyson In Liger Movie) या चित्रपटामध्ये माइक टायसन काम करणार आहेत. करण जोहरने सोशल मीडियावर माइक टायसन त्याच्या चित्रपटात काम करणार असल्याची घोषणा केली आहे.

    करण जोहरने आपल्या या पोस्टमध्ये लिहिलं आहे की, “भारतीय चित्रपटांच्या इतिहासात पहिल्यांदा रिंगचा खरा किंग भारतीय सिनेमामध्ये काम करणार आहे. माइक टायसन यांचं ‘लायगर’च्या टीममध्ये स्वागत आहे.”

    ‘लायगर’हा क्रीडा क्षेत्रावर आधारित चित्रपट आहे. यात विजय देवरकोंडाही प्रमुख भूमिकेत आहे. तसेच अनन्या पांडेही या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन पुरी जगन्नाथ करणार असून राम्या कृष्णन, चार्मी आणि रोनित रॉय बोस हे कलाकारही या चित्रपटात आपल्याला पाहायला मिळणार आहेत.