brahmastra

अयान मुखर्जी (Ayan Mukherjee) दिग्दर्शित ब्रह्मास्त्र (Brahmastra) चित्रपट लवकरच रिलीज होणार आहे. पण आता ट्विटरवर #BoycottBrahmastra ट्रेंड सुरु झाला आहे.

    अयान मुखर्जी (Ayan Mukherjee) दिग्दर्शित ब्रह्मास्त्र (Brahmastra) चित्रपट लवकरच रिलीज होणार आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला. या चित्रपटात रणबीर कपूर, आलिया भट्ट, अमिताभ बच्चन, नागार्जुन आणि मौनी रॉय यांच्या मुख्य भूमिका आहेत. चित्रपटातील व्हीएफएक्स सीनचं सगळीकडे कौतुक होत आहे. याशिवाय बॅकग्राउंड म्युझिकनंही सर्वांची मनं जिंकली आहेत. पण आता ट्विटरवर #BoycottBrahmastra ट्रेंड सुरु झाला आहे.

    सध्या सोशल मीडियावर ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपटाच्या ट्रेलरची खूप चर्चा सुरू आहे. रणबीर कपूर आणि आलियाच्या जोडीचं काम खूप सुंदर आहे. मात्र या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये एक चूक झाल्याचं नेटकऱ्यांचं म्हणणं आहे.  चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी केली जात आहे. यावर अभिनेता रणबीर कपूरने संताप व्यक्त केला आहे.

    ट्विटरवर ‘ब्रह्मास्त्र’ ट्रेलरचे काही स्क्रिनशॉट बरेच व्हायरल होताना दिसत आहेत. ज्यात एका सीनमध्ये रणबीर कपूर मंदिरात जाताना दिसत आहे. मंदिरात जाताना तो उडी मारून मंदिरासमोरील घंटा वाजवताना दिसत आहे. पण या सीनमध्ये रणबीरच्या पायात बूट दिसत आहे.त्यामुळे नेटकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. अनेकांनी या चित्रपटाला बॉयकॉट करण्याची मागणी केली आहे.