ब्रह्मास्त्र चित्रपटाची २०० कोटींच्या क्लबमध्ये एन्ट्री!

ब्रह्मास्त्रचा हा यशस्वी दुसर्‍या वीकेंड असे बघता ब्रह्मास्त्र पुढील काही आठवडे आपली जादु दाखवण्यात यशस्वी राहील  आणि बॉक्स ऑफिसवर मोठी कमाई करेल असं वाटतयं.

    रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांच्या ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपटानं  (Brahmastra) बॉक्स ऑफिसवर दुसऱ्या वीकेंडमध्ये चांगला यश कमावलयं. अयान मुखर्जी दिग्दर्शित या चित्रपटाने देशभरात त्याच्या दुसऱ्या वीकेंडमध्ये 41 कोटींचा व्यवसाय केला असून गेल्या 10 दिवसांत चित्रपटानं एकूण कलेक्शन 207.90 कोटी कमावले आहे. हिंदी चित्रपटानं दुस-या वीकेंडमध्ये 38.35 कोटी तर, दक्षिण भाषेतील चित्रपटानं 2.65 कोटी रुपये कमावले आहेत.

    ब्रह्मास्त्रचा हा यशस्वी दुसर्‍या वीकेंड असे बघता ब्रह्मास्त्र पुढील काही आठवडे आपली जादु दाखवण्यात यशस्वी राहील  आणि बॉक्स ऑफिसवर मोठी कमाई करेल असं वाटतयं. उत्तर भारतातील 250 कोटी रुपये कमाई करण्याचं लक्ष्य असून प्रेक्षकांचा प्रतिसाद बघता तो पुर्ण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तर, परदेशातही या चित्रपटाची क्रेझ पाहायला मिळत असून, 10 दिवसांतील कलेक्शऩ अंदाजे $12.30 दशलक्ष आहे आणि ते $15 दशलक्ष पुर्ण होण्याच्या दिशेने त्याची वाटचाल सुरू आहे.