breathe into the shadows

‘ब्रीद: इनटू द शॅडोज’चा (Breathe Into The Shadows) नवा सीजन ९ नोव्हेंबरला प्रदर्शित होणार आहे. या सीरिजमध्ये अभिषेक बच्चन (Abhishek Bachchan) आणि अमित साध (Amit Sadh) पुन्हा एकदा मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.

    प्राइम व्हिडिओची (Prime Video) ओरिजनल सीरीज ‘ब्रीद: इनटू द शॅडोज’चा (Breathe Into The Shadows) नवा सीजन ९ नोव्हेंबरला प्रदर्शित होणार आहे. अनोख्या ट्विस्ट आणि टर्नने खच्चून भरलेल्या या सायकॉलॉजिकल-थ्रिलरमध्ये अभिषेक बच्चन (Abhishek Bachchan) आणि अमित साध (Amit Sadh) पुन्हा एकदा मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. या सीरिजमध्ये नित्या मेनन, सैयामी खेर आणि इवाना कौर यांच्याही भूमिका आहेत.

    भारतातील प्राइम वीडियो ओरिजिनल्सच्या मुख्य अपर्णा पुरोहित म्हणतात, ‘ब्रीद: इनटू द शॅडोज’ या थ्रिलरचा सीरिजचा नवीन सीझन प्रदर्शित करताना आम्हाला आनंद होत आहे. एखाद्या शोच्या यशाचा पुरावा म्हणजे जेव्हा प्रेक्षक नव्या सीझनची मागणी करू लागतात. या सस्पेन्सफुल थ्रिलरचा नवीन सीझन आशा आणि चिंतेने ओतप्रोत असून, प्रेक्षकांचे मनोरंजन होईल. अबुदंतिया एंटरटेनमेंटसोबत आम्ही अनेक शो आणि चित्रपटांमध्ये सहयोग केला आहे. मात्र ‘ब्रीद’ फ्रँचायझी नेहमीच खास असेल कारण ती पहिली होती. ‘ब्रीद: इनटू द शॅडोज’ सीझन २ एक वेधक, सस्पेन्सफुल ड्रामा आहे. ज्यामध्ये परिपूर्ण थ्रिलरचे सर्व पैलू असून, त्यांना उत्तम प्रकारे अंमलात आणले आहे.

    विक्रम मल्होत्रा ​​आणि अबुदंतिया एंटरटेनमेंटद्वारे निर्मित, आठ भागांची ही सीरिज मयंक शर्मा यांनी सह-निर्मित आणि दिग्दर्शित केली आहे. दिग्दर्शक मयंक शर्मा यांनी अर्शद सय्यद, विक्रम तुली, प्रिया सग्गी आणि अभिजित देशपांडे यांच्यासोबत ब्रीद: इनटू द शॅडोजच्या नवीन सीझनचे सह-लेखन केले आहे.