britney spears

ब्रिटनी स्पीयर्स (Britney Spears Wedding) ९ जून रोजी होणारा पती सॅम असगरीसोबत (Sam Asghari) लग्न करणार होती. ब्रिटनी आणि तिचा होणारा पती लग्नाच्या ठिकाणीही पोहोचले होते. पण त्यांच्या लग्नात ब्रिटनीचा आधीचा पती जेसन अलेक्झँडरने गोंधळ घातला.

  लग्नामध्ये गोंधळ होण्याचे प्रकार काही नवीन नाहीत. अनेकदा बॉयफ्रेंडने आपल्या गर्लफ्रेंडच्या लग्नात राडा केल्याचे प्रकार समोर आले आहेत. मात्र हे केवळ सामान्य लोकांच्या बाबतीत नाही तर सेलिब्रिटींच्या आयुष्यातही घडते. अमेरिकी सिंगर ब्रिटनी स्पीयर्सच्या लग्नात असाच काहीसा प्रकार घडला आहे. ब्रिटनी स्पीयर्स (Britney Spears Wedding) ९ जून रोजी होणारा पती सॅम असगरीसोबत(Sam Asghari) लग्न करणार होती.  ब्रिटनी आणि तिचा होणारा पती लग्नाच्या ठिकाणीही पोहोचले होते. पण त्यांच्या लग्नात ब्रिटनीचा आधीचा पती जेसन अलेक्झँडरने गोंधळ घातला. जेसन अलेक्झांडरने (Jason Alexander)  ब्रिटनी स्पीयर्सच्या लग्नात जबरदस्तीने जाण्याचा प्रयत्न केला.

  मिळालेल्या माहितीनुसार, ब्रिटनी स्पीयर्सच्या लग्नाच्या काही तास आधी जेसनने आधीच्या पत्नीच्या कॅलिफोर्नियातील घरात प्रवेश केला. जेसनने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर लाईव्ह करुन ही माहिती दिली. त्यानंतर तो ब्रिटनी स्पीयर्सच्या लग्नाच्या ठिकाणी गेला. लाईव्हमध्ये, जेसन सुरक्षा रक्षकांना सांगताना दिसत आहे की ब्रिटनी स्पीयर्सने तिला तिच्या लग्नासाठी आमंत्रित केले. मात्र सुरक्षारक्षकांनी त्याला अडवले. गार्ड्स जेसनला आत जाऊ देत नाहीत, तेव्हा तो ब्रिटनीच्या लग्नाच्या हॉलमध्ये जबरदस्तीने घुसण्याची धमकी देतो.

   

  View this post on Instagram

   

  A post shared by Britney Spears (@britneyspears)

  जेसन अलेक्झांडरचे सुरक्षा रक्षकांशी भांडण झाले. त्याने ब्रिटनी माझी पहिली पत्नी असल्याचे ओरडण्यास सुरुवात केली. मी तिचा पहिला पती आहे. मी इथे तिच्या लग्नासाठी आलो आहे. जेसन आणि ब्रिटनी स्पीयर्स २००४ मध्ये विवाहबद्ध झाले.मात्र हे लग्न केवळ ५५ तास टिकले. जेसननंतर, ब्रिटनी स्पीयर्सने त्याच वर्षी केविन फेडरलाइनशी लग्न केले. मात्र २००७ मध्ये त्यांचाही घटस्फोट झाला.

  ब्रिटनी स्पीयर्स गेल्या ६ वर्षांपासून सॅम असगरीला डेट करत होती. दोघांचे ९ जून रोजी लग्न झाले. यावेळी गोंधळ घालणाऱ्या जेसनला पोलिसांनी जेसनला अटक केली.