लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराला आला अल्लू अर्जुन; चाहते आऊट ऑफ कंट्रोल, गुन्हा दाखल!

दक्षिण भारतीय अभिनेता अल्लू अर्जुनवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चाहत्यांच्या गर्दीमुळे वाहतुकीचा प्रश्न निर्माण झाल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  सध्या दाक्षिणात्य अभिनेता अल्लू अर्जुन (Allu Arjun) पुष्पा 2 चित्रपटामुळे चांगलाच चर्चेत आहे. चित्रपटाचा टिझर समोर आल्यानंतर त्याचं खुप कौतुक होताना दिसत आहे. फॅन्स तर आतुरतेने चित्रपटाची वाट पाहत आहेत. चाहते अल्लूची एक झलक पाहण्यासाठी नेहमीच उत्सुक असतात. तो कुठेही गेला तरी त्याचे चाहते त्याला फॉलो करतात. नुकतचं अल्लू त्याचा जवळचा मित्र आणि वायएसआरसीपी आमदार रविचंद्र किशोर रेड्डीच्या प्रचारासाठी नंद्याल येथे गेला होता. अल्लू आल्याचं कळताच त्याची एक झलक पाहण्यासाठी चाहत्यांची गर्दी झाली होती. मीडिया रिपोर्ट्सनुसार, अल्लू आयपीसीच्या कलम 188 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  चाहत्यांच्या गर्दीमुळे समस्या

  अल्लू अर्जुनला पाहण्यासाठी रविचंद्र यांच्या निवासस्थानी मोठ्या संख्येने चाहते आणि समर्थक आले होते आणि यामुळे मोठ्या प्रमाणात कायदा आणि सुव्यवस्था आणि वाहतूक समस्या निर्माण झाल्यामुळे लोकांना समस्यांना सामोरे जावे लागले.

  गुन्हा दाखल

  मीडिया रिपोर्ट्सनुसार, अभिनेता अल्लू अर्जुन आणि रवी चंद्र किशोर रेड्डी यांच्या टीमने कोणतीही परवानगी घेतली नव्हती, त्यामुळे अल्लू अर्जुन आणि रवी चंद्र रेड्डी यांच्या विरोधात आयपीसीच्या कलम 188 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  अल्लू अर्जुनची पत्नीही त्याच्यासोबत होती

  दाक्षिणात्य अभिनेता अल्लू अर्जुन त्याची पत्नी स्नेहासोबत होती. अल्लूला त्याच्या मित्रासाठी प्रचार करताना पाहून चाहते खूप रोमांचित झाले होते. मीडिया रिपोर्ट्सनुसार, मोठ्या गर्दीमुळे प्रकरणावर नियंत्रण मिळवता आले नाही, त्यामुळे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या या संदर्भात अजून तपास सुरू आहे.