chala hawa yeu dya

‘चला हवा येऊ द्या’ बद्द्ल नवीन माहिती समोर आली आहे. ‘चला हवा येऊ द्या’ मधले कलाकार आता परदेश दौरा(Chala Hawa Yeu Dya Newa Season) करणार आहेत.

    झी मराठी(Zee Marathi) वाहिनीवरील ‘चला हवा येऊ द्या’(Chala Hawa Yeu Dya) हा कार्यक्रम प्रेक्षकांचा खूप आवडता कार्यक्रम आहे. या लोकप्रिय कार्यक्रमात अनेक बॉलिवूड सेलिब्रेटी, मराठी चित्रपट, नाटक क्षेत्रासह राजकीय नेतेदेखील हजेरी लावत असतात. ‘चला हवा येऊ द्या’ बद्द्ल नवीन माहिती समोर आली आहे. ‘चला हवा येऊ द्या’ मधले कलाकार आता परदेश दौरा(Chala Hawa Yeu Dya Newa Season) करणार आहेत.

    झी मराठीने नुकताच एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत याविषयीची माहिती दिली आहे. या व्हिडिओमध्ये भाऊ कदम, निलेश साबळे, भारत गणेशपुरे, कुशल बद्रिके हे कलाकार विमानात बसलेले दिसत आहेत. श्रेया बुगडे ही विमानाच्या मागे, तसेच सागर कारंडे हा विमानाच्या पंखांना लटकल्याचे बघायला मिळत आहे. “भाऊचा पंगा, अमेरिकेत दंगा; चला हवा येऊ द्या, वऱ्हाड निघालयं अमेरिकेला,” असा संदेश या व्हिडीओच्या माध्यमातून देण्यात आला आहे.

    या व्हिडीओला ‘वऱ्हाड निघालं अमेरिकेला, नवीन पर्व ६ डिसेंबरपासून,’असे कॅप्शन देण्यात आले आहे. झी मराठीने दिलेल्या माहितीनुसार, येत्या ६ डिसेंबरपासून ‘चला हवा येऊ द्या’चे नवीन पर्व सुरु होत आहे.