narayan-rane-nilesh-sable

 ‘चला हवा येऊ द्या’(Chala Hawa Yeu Dya) या कॉमेडी शोमध्ये केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane)यांची बदनामी होईलं अशा पद्धतीने त्यांचं पात्र दाखवण्यात आलं होतं. त्यानंतर संपूर्ण राज्यभरात नारायण राणेंच्या समर्थकांनी संताप व्यक्त केला गेला. त्यानंतर कार्यक्रमाचे सूत्रसंचालक निलेश साबळे(Nilesh Sable Apologized Narayan Rane) आणि त्यांच्या टीमने केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची भेट घेऊन माफी मागितली आहे.

    ‘चला हवा येऊ द्या’(Chala Hawa Yeu Dya) या कॉमेडी शोची एका वेगळ्या कारणामुळे सध्या चर्चा सुरु आहे. या शोमध्ये केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane)यांची बदनामी होईलं अशा पद्धतीने त्यांचं पात्र दाखवण्यात आलं होतं. त्यानंतर संपूर्ण राज्यभरात नारायण राणेंच्या समर्थकांनी संताप व्यक्त केला गेला. त्यानंतर कार्यक्रमाचे सूत्रसंचालक निलेश साबळे(Nilesh Sable Apologized Narayan Rane) आणि त्यांच्या टीमने केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची भेट घेऊन माफी मागितली आहे.

    निलेश साबळे आणि कार्यक्रमातील काही सहकाऱ्यांनी मिळून राणेंच्या अधिश निवासस्थानी भेट घेतली. यावेळी निलेश साबळेने नारायण राणे यांची पाया पडून माफी मागितली. ‘चला हवा येऊ द्या’ कार्यक्रमात अधिवेशनाच्या प्रसंगात नारायण राणेंचे पात्र दाखवण्यात आले होते. मात्र यावेळी राणेंचे पात्र ज्या पद्धतीने रंग‌वण्यात आले त्यावर राणेंच्या समर्थकांनी आक्षेप नोंदविला होता. राणेंच्या समर्थकांनी आणि कार्यकर्त्यांनी झी टीव्ही आणि निलेश साबळेला फोन करून संताप व्यक्त केला होता. त्यामुळे निलेश साबळे व टीमने राणे यांची भेट घेऊन माफी मागितली. यावेळी आमदार नितेश राणेदेखील उपस्थित होते.

    कुणाच्याही भावना दुखावण्याचा आमचा हेतू नव्हता. आमच्या टीमकडून पुन्हा अशी चूक होणार नसल्याचे साबळे यांनी सांगितले.