
"गेली ९ वर्ष चला हवा येऊ द्या शो प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. तुर्तास झी मराठीने चला हवा येऊ द्या शो थांबवण्याचा निर्णय घेतलाय." असं निलेश साबळेने म्हण्टलं आहे.
गेल्या नऊ वर्षापासून महाराष्ट्रातील प्रेक्षकांना खळखळुन हसवणाऱ्या चला हवा येऊ द्या (Chala Hawa Yeu Dya) कार्यक्रमाबद्दल एक अपडेट आलं आहे. अनेक वर्षापासून प्रेक्षकांचं मनोरंजन करणारी ही मालिका लवकरच बंद होणार आहे. चला हवा येऊ द्या चा दिग्दर्शक – लेखक – अभिनेता निलेश साबळेने स्वतः ही माहिती दिली आहे.
चला हवा येऊ द्या होणार बंद?
प्रेक्षकांच भरभरुन मनोरंजन करणारी ही मालिका बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. निलेश साबळेने एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत चला हवा येऊ द्या बंद होणार असल्याचं सांगितलं आहे. निलेश म्हणाला, “गेली ९ वर्ष चला हवा येऊ द्या शो प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. तुर्तास झी मराठीने चला हवा येऊ द्या शो थांबवण्याचा निर्णय घेतलाय.”
‘या’ कारणामुळे मालिका होणार बंद
महाराष्ट्रातील घराघरात बघितला जाणारी हा कार्यक्रम बंद होणार असल्याचं कळताच प्रेक्षकांना अनेक प्रश्न पडलेत. मात्र, या कार्यक्रमाबाबत बोलतान निलेश पुढे म्हणाला की, “चला हवा येऊ द्या च्या माध्यमातुन कार्यक्रमामधील कलाकारांना खुप लोकप्रियता आणि प्रसिद्धी मिळाली. प्रत्येकाला आयुष्यात आर्थिक स्थैर्य प्राप्त झाले. पण तुर्तास थांबण्याचा निर्णय घेत आहोत. पण काही महिन्यांनी नवीन पर्वाच्या माध्यमातुन आम्ही पुन्हा भेटीला येऊ.