
एका वेबसाइटनं ‘चंद्रमुखी 2’ चित्रपट लीक केला आहे. एचडीमध्ये हा चित्रपट लीक झाला आहे. त्यामुळे याचा कंगनाच्या चित्रपटाच्या कमाईवर परिणाम होण्याची शक्यता आहे.
कंगना रणौतचा (kangana Ranaut) ‘चंद्रमुखी 2’(Chandramukhi 2) हा चित्रपट आज रिलीज झाला आहे. जवळपास दीड वर्षांनंतर कंगना ‘चंद्रमुखी 2’ या चित्रपटाच्या माध्यमातून मोठ्या पडद्यावर परतली आहे. आज ‘चंद्रमुखी 2’ बरोबर ‘फुकरे 3’ आणि ‘द व्हॅक्सिन वॉर’ हे चित्रपटही रिलीज झाले आहेत. त्यामुळे बॉक्स ऑफिसवर कंगनाचा चित्रपट बाजी मारणार का? हे आगामी काळातच समजेल. पण त्यापूर्वी कंगनाचा ‘चंद्रमुखी २’ चित्रपट एचडीमध्ये लीक झाल्याचं समोर आलं आहे.
याआधी 2005 साली प्रदर्शित झालेल्या रजनीकांत यांच्या ‘चंद्रमुखी’चा सीक्वल कंगनाचा ‘चंद्रमुखी 2’ चित्रपट आहे. पी वासू यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केलं आहे. कंगना व्यतिरिक्त या चित्रपटात राघव लॉरेंस, राधिका सरथकुमार, वादिवेलू, लक्ष्मी मेनन, महिमा नांबियार, सृष्टी डांगे, रवी मारिया आणि सुरेश मेनन यांच्या मुख्य भूमिका आहेत. आज हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. पण रिलीज होऊन एक दिवस पूर्ण व्हायच्या आधी हा सिनेमा लीक झाला आहे.
एका वेबसाइटनं ‘चंद्रमुखी 2’ चित्रपट लीक केला आहे. एचडीमध्ये हा चित्रपट लीक झाला आहे. त्यामुळे याचा कंगनाच्या चित्रपटाच्या कमाईवर परिणाम होण्याची शक्यता आहे.
कंगनाच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, 2022 मध्ये तिचा ‘धाकड’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट फारसा चालला नव्हता. त्यानंतर दीड वर्षांनी कंगना ‘चंद्रमुखी 2’ प्रदर्शित झाला आहे. यानंतर ती ‘तेजस’ आणि ‘इमरजेंसी’ या चित्रपटात झळकणार आहे.