subodh bhave chandrayaan dekhava

सुबोधनं शेअर केलेल्या पहिल्या फोटोमध्ये इस्रोच रॉकेट, चंद्र अन् विक्रम रोव्हर पाहायला मिळत आहेत. या चांद्रयानाच्या देखाव्यामध्ये बाप्पा विराजमान झाल्याचं दिसत आहे.  दुसऱ्या फोटोमध्ये सुबोधची मुलं देखाव्याबरोबर फोटो काढताना पाहायला मिळत आहेत.

    बाप्पाच्या आगमनामुळे सगळीकडे चैतन्याचं वातावरण निर्माण झालं आहे. मराठी कलाकार मंडळींच्या घरी देखील बाप्पा विराजमान झाले आहेत. सध्या अभिनेता सुबोध भावेच्या (Subodh Bhave) मुलांनी बाप्पासाठी केलेल्या आकर्षक देखाव्यानं सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

    सुबोध भावेच्या घरी दरवर्षीप्रमाणे याही वर्षी गणपती बाप्पा विराजमान झालं आहेत. गणेशोत्सवाचे (Ganeshotsav 2023) फोटो सुबोधनं सोशल मीडियावर शेअर केले आहेत. यंदा त्याच्या मुलांनी बाप्पासाठी ‘चांद्रयान-3’चा देखावा बनवला आहे. (Chandrayaan 3)

    सुबोधनं शेअर केलेल्या पहिल्या फोटोमध्ये इस्रोच रॉकेट, चंद्र अन् विक्रम रोव्हर पाहायला मिळत आहेत. या चांद्रयानाच्या देखाव्यामध्ये बाप्पा विराजमान झाल्याचं दिसत आहे.  दुसऱ्या फोटोमध्ये सुबोधची मुलं देखाव्याबरोबर फोटो काढताना पाहायला मिळत आहेत.

    सुबोधनं हे दोन्ही फोटो शेअर करत लिहीलं आहे की, “गणपती बाप्पा मोरया…यंदाच्या वर्षी आमच्या घरी मुलांनी सादर केलेला देखावा “चांद्रयान-३”…श्री गणेश आपल्या सर्वांना उत्तम आयुष्य, आरोग्य देवो हीच श्रीचरणी प्रार्थना…मोरया”.

    सुबोध भावेच्या मुलांनी बनवलेला हा देखावा पाहून अनेकांनी कौतुक केलं आहे. एका नेटकरीनं लिहीलं आहे की, “वाह… खूपच सुंदर, समर्पक व समयोचित देखावा. गणपती बाप्पा मोरया…तुम्हाला सर्वांना श्री गणेश चतुर्थी व गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा” तर दुसऱ्या नेटकरीनं लिहीलं आहे की, “छान वाटत हे बघताना.. कारण हे दुर्मीळच होत चाललंय.”