VIDEO बेली डान्सच्या व्हिडीओमुळे अभिनेत्री देवोलीना भट्टाचार्जी ट्रोल नेटकरी संतापून म्हणाले…

देवोलीनाचा हा हॉट लूक पाहून अनेक जण अवाक झाले आहेत.काहींनी देवोलीनाचं कौतुक केलंय. तर काही नेटकऱ्यांनी मात्र तिला ट्रोल करायला सुरूनवात केली आहे.

  छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री देवोलीना भट्टाचार्जी सोशल मीडियावर चांगलीच सक्रीय आहे. ती नेहमी आपल्या डान्सचे व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असते. देवोलीनाने नुकताच तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक बेली डान्स करतानाचा व्हिडीओ शेअर केलाय. या व्हिडीओने अनेकांचं लक्ष वेधून घेतलंय.

   

  View this post on Instagram

   

  A post shared by Devoleena Bhattacharjee (@devoleena)

  देवोलीनाचा हा हॉट लूक पाहून अनेक जण अवाक झाले आहेत. हा व्हिडीओ शेअर करत देवोलीना कॅप्शनमध्ये म्हणाली, “सराव..सराव आणि सराव.. या डान्सच्या प्रेमात आहे. अजून मी पूर्ण शिकले नाही. सध्या शिकत आहे हा डान्स त्यामुळे पूर्ण व्हिडीओ शेअर केला नाही. माझा कोर्स पूर्ण झाला की मी नक्की पूर्ण डान्स शेअर करेल. तोपर्यंत हे एन्जॉय करा.” असं देवोलिीना तिच्या कॅप्शनमध्ये म्हटलय. काहींनी देवोलीनाचं कौतुक केलंय. तर काही नेटकऱ्यांनी मात्र तिला ट्रोल करायला सुरूनवात केली आहे.

   

  View this post on Instagram

   

  A post shared by Devoleena Bhattacharjee (@devoleena)

  देवीलीनाच्या या व्हिडीओवर एक नेटकऱी कमेंट करत म्हणाला, “गोपी बहू हे काय?” तर दुसरा युजर म्हणाला, ” गोपी बहू संस्कार विसरलीस” तर आणखी एक युजर म्हणालाय, “हळू नाच नाहितर पुन्हा तुझी पाठदूखी सुरू होईल.”