hrishikesh pandey

अभिनेता हृषिकेश पांडेची (Hrishikesh Pandey) बॅग चोरीला (Robbed) गेली आहे. हृषिकेश आपल्या कुटुंबातल्या काही लोकांसोबत मुंबईत एसी-बसमध्ये फिरत होता. त्याच्या बॅगेत असलेले पैसे आणि काही कागदपत्रं होती ती चोरीला गेली आहेत.

  ‘सीआयडी’ (CID) मालिकेमध्ये इन्स्पेक्टर सचिनची भूमिका साकारणारा अभिनेता हृषिकेश पांडेची (Hrishikesh Pandey) बॅग चोरीला (Robbed) गेली आहे. हृषिकेश आपल्या कुटुंबातल्या काही लोकांसोबत मुंबईत एसी-बसमध्ये फिरत होता. त्याच्या बॅगेत असलेले पैसे आणि काही कागदपत्रं होती ती चोरीला गेली आहेत. ही घटना रविवारी घडली. कुटुंबियांसोबत एलिफंटा केव्सला भेट देण्यासाठी जाताना ही चोरी झाल्याची माहिती मिळाली आहे. त्यावेळी कुलाबावरून ताडदेवसाठी बस पकडली असताना त्याची बॅग चोरीला गेली. या चौरीची तक्रार कुलाबा आणि मालाड पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे.

   

  View this post on Instagram

   

  A post shared by Hrishikesh Pandey (@hrishikesh.11)

  ह्रषिकेशने मुलाखतीत सांगितलं, “संध्याकाळी साडेसहा वाजताच्या सुमारास आम्ही एसी बसमध्ये चढलो. बसमधून उतरल्यावर माझ्या लक्षात आलं की माझी बॅग चोरीला गेली. त्यात पैसे, क्रेडिट कार्ड्स, आधार कार्ड, पॅन कार्ड आणि इतर काही महत्त्वाची कागदपत्रं होती. याबद्दल मी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.”

  सीआयडी मालिकेत इन्स्पेक्टरची भूमिका साकारणाऱ्या हृषिकेशलाच चोरीच्या घटनेला सामोरं जावं लागल्याने तो पुढे म्हणाला, “मी मालिकेत सीआयडी इन्स्पेक्टरची भूमिका साकारली होती. खऱ्या आयुष्यातही अनेकजण माझ्याकडे मदत मागायला यायचे. आता माझ्यासोबतच चोरीची घडना घडली आहे. त्यामुळे हा एक विनोदच झाला आहे. पोलिसांना चोराचा शोध लवकराच लवकर लागू दे अशी मी अपेक्षा करतो.”