83 movie poster

लग्नानंतरचा अभिनेता रणवीर सिंह (Ranveer Singh) आणि दीपिका पादूकोणचा (Deepika Padukone) ‘83’ हा पहिला एकत्र चित्रपट आहे. भारतातील जवळपास ३७४१ चित्रपटगृहांमध्ये २४ डिसेंबर रोजी ‘83’ हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. पहिल्याच दिवशी या चित्रपटाने चांगली कमाई (83 Movie First Day Box Office Collection) केली आहे.

    ‘83’ (83 Movie) हा चित्रपट नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आहे. लग्नानंतरचा अभिनेता रणवीर सिंह (Ranveer Singh) आणि दीपिका पादूकोणचा (Deepika Padukone) ‘83’ हा पहिला एकत्र चित्रपट आहे. भारतातील जवळपास ३७४१ चित्रपटगृहांमध्ये २४ डिसेंबर रोजी ‘83’ हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे.पहिल्याच दिवशी या चित्रपटाने चांगली कमाई केली आहे.

    भारतीय संघाने २५ जून १९८३ रोजी लंडनमधील लॉर्ड्सच्या मैदानावर क्रिकेट विश्वचषक जिंकला होता. याच विजयगाथेवर आधारित ‘83’ हा चित्रपट आहे.  ‘83’ या चित्रपटाने पहिल्या दिवशी १५ कोटी रुपयांची कमाई केली असल्याची माहिती मिळाली आहे.  नाताळ आणि विकेंड असल्यामुळे चित्रपटाची कमाई येत्या दोन दिवसांमध्ये वाढण्याची शक्यता आहे.

    ‘८३’ चित्रपटात रणवीर सिंगने भारताचे माजी क्रिकेट कर्णधार कपिल देव यांची भूमिका साकारली आहे. या चित्रपटात दीपिका पादुकोणनं रणवीरच्या ऑनस्क्रीन पत्नीची म्हणजेच कपिल देव यांची पत्नी रोमी भाटिया यांची भूमिका साकारली आहे. या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा चित्रपट दिग्दर्शक कबीर खान सांभाळली आहे. चित्रपटाच्या टीममध्ये रणवीर सिंग, एमी विर्क, चिराग पाटील ,साकीब सलीम ,ताहिर भसीन ,जतिन सरना ,जीवा, आदिनाथ कोठारे, साहिल खट्टर,पंकज त्रिपाठी हे कलाकार मुख्य भूमिकेत झळकले आहेत.