83 movie poster

‘83’ चित्रपट (83 Movie Flop) प्रदर्शित होण्याआधी हा चित्रपट २०२१ मधील सर्वात मोठा चित्रपट ठरेल अशी अपेक्षा होती. मात्र, आता याची कामगिरी पाहता या सगळ्यावर पाणी फिरले आहे. या चित्रपटातून रणवीरचे (Loss Of Ranveer Singh) मोठे नुकसान झाले आहे.

    बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंह (Ranveer Singh) आणि अभिनेत्री दीपिका पादुकोणचा(Deepika Padukone) चित्रपट ‘83’ (83 On Box Office) रिलीज होण्यापूर्वी केवळ निर्मात्यांनाच नाही तर प्रेक्षकांनाही हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी करेल, अशी अपेक्षा होती. (83 Movie Flop)‘83’ चित्रपट प्रदर्शित होण्याआधी हा चित्रपट २०२१ मधील सर्वात मोठा चित्रपट ठरेल अशी अपेक्षा होती. मात्र, आता याची कामगिरी पाहता या सगळ्यावर पाणी फिरले आहे. या चित्रपटातून रणवीरचे(Loss Of Ranveer Singh) मोठे नुकसान झाले आहे. आतापर्यंत या चित्रपटाने भारतात केवळ ५८ कोटींचा व्यवसाय केला आहे.

    ‘83’ हा चित्रपट फ्लॉप असल्याचं म्हटलं जात असून, सर्वात जास्त नुकसान चित्रपटाचा आघाडीचा स्टार रणवीर सिंहच झालं आहे. आता रणवीरच्या फीमध्ये देखील कपात होणार आहे. काही काळापूर्वी अशी बातमी आली होती की, अलीकडील ट्रॅक रेकॉर्ड आणि त्याच्या वाढत्या फॅन फॉलोइंगचा विचार करता रणवीर दुहेरी डबल चार्ज घेणार अशी चर्चा होती.

    ‘83’ या चित्रपटासाठी, रणवीर सिंहने निर्मात्यांना २० कोटी फी व्यतिरिक्त नफ्यातील वाटा मागितला होता. परंतु, ज्या प्रकारे चित्रपट फ्लॉप झाला, त्यामुळे त्याला देखील आता किंमत मोजावी लागणार आहे. २५० कोटींच्या बजेटमध्ये बनलेला हा चित्रपट केवळ ५८ कोटींच्या जवळपास पोहोचू शकला.