ॲक्शन-पॅक्ड ‘RRR’ ट्रेलर रिलीज, ज्युनियर एनटीआर-राम चरण एका दमदार भूमिकेत

Action-packed 'RRR' trailer released, Jr NTR-Ram Charan seen in a strong character: एसएस राजामौली यांचा बहुप्रतिक्षित पीरियड ॲक्शन ड्रामा चित्रपट 'RRR' चा ट्रेलर रिलीज झाला आहे. बाहुबली मालिकेचे दिग्दर्शक राजामौली या चित्रपटाबद्दल खूप उत्सुक होते. हा चित्रपट हिंदीशिवाय अनेक भारतीय भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. 'RRR' हा एक बिग बजेट चित्रपट आहे. या चित्रपटात Jr NTR आणि राम चरण (Ram Charan) महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. याशिवाय अजय देवगण (Ajay Devgn), आलिया भट्ट (Alia Bhatt), ऑलिव्हिया मॉरिस (Olivia Morris), रे स्टीव्हनसन (Ray Stevenson) आणि ॲलिसन डूडी (Alison Doody) सारखे दमदार कलाकारही या चित्रपटाचा भाग असणार आहेत. 'RRR' हा चित्रपट तेलगू स्वातंत्र्यसैनिक अल्लुरी सीताराम राजू आणि कोमाराम भीम यांच्यापासून प्रेरित एक काल्पनिक कथा सांगतो. राम चरण सीतारामच्या भूमिकेत दिसणार आहे, तर ज्युनियर एनटीआर आरआरआरमध्ये कोमारामच्या भूमिकेत दिसणार आहे. हा चित्रपट ७ जानेवारीला जगभरात प्रदर्शित होणार आहे. पाहा चित्रपटाचा जबरदस्त ट्रेलर.