
अभिनेते देव आनंद (Dev Anand) यांच्या जुहू येथील प्रसिद्ध बंगल्याची अखेर विक्री झाली आहे. या बंगल्याची तब्बल 400 कोटी रुपयांना विक्री झाल्याचे सांगण्यात येत आहे. या बंगल्याची खरेदी मुंबईतील एका प्रसिद्ध बांधकाम कंपनीने केल्याचे सांगितले जात आहे.
मुंबई : अभिनेते देव आनंद (Dev Anand) यांच्या जुहू येथील प्रसिद्ध बंगल्याची अखेर विक्री झाली आहे. या बंगल्याची तब्बल 400 कोटी रुपयांना विक्री झाल्याचे सांगण्यात येत आहे. या बंगल्याची खरेदी मुंबईतील एका प्रसिद्ध बांधकाम कंपनीने केल्याचे सांगितले जात आहे. आता या बंगल्याच्या जागी लवकरच 22 मजली आलिशान टॉवर उभारण्यात येणार आहे.
देव आनंद यांचा जुहू येथे समुद्रकिनारी आलिशान बंगला आहे. त्या बंगल्यात ते जवळपास 40 वर्षे राहिले. त्यांच्यासोबत त्यांची पत्नी कल्पना कार्तिक, मुलगा व मुलगी तिथे राहत होते. मात्र, त्यांच्या मृत्यूनंतर पत्नी व मुलगी उटी येथे वास्तव्यास गेले. त्यांचा मुलगा अमेरिकेत स्थायिक झाला आहे. त्यामुळे बंगल्यात राहण्यासाठी किंवा त्याच्या देखरेखीसाठी कोणीही नसल्याने त्याची विक्री करण्याचा निर्णय आनंद कुटुंबीयांनी घेतला. या बंगल्याला 400 कोटींची किंमत मिळाल्याचे म्हटले जाते.
पुतण्याकडून बंगला विक्रीस दुजोरा नाही
सध्या देव आनंद यांच्या बंगल्याची विक्री झाल्याचे म्हटले जात असले तरी त्यांचे पुतणे केतन आनंद यांनी मात्र या विक्रीचे वृत्त खोडून काढले. या संदर्भात देव आनंद यांच्या पत्नी व मुलीशी आपले बोलणे झाले आहे. या बंगल्यासंबंधी कोणताही व्यवहार झाला नसल्याचेही केतन आनंद यांनी म्हटले आहे.