अभिनेत्री मंदिरा बेदीच्या पतीचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन

मंदिरा बेदी आणि राज कौशल यांची पहिली भेट मुकुल आनंद यांच्या घरी झाली होती. मंदिरा तेथे ऑडिशन द्यायला गेली होती. राज मुकुल आनंद यांचे असिस्टंट म्हणून काम पाहत होते.

    मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री मंदिरा बेदीचे पती राज कौशल यांचं आज सकाळी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं आहे. राज कौशल यांनी अभिनेता म्हणून आपल्या करिअरला सुरूवात केली. तसेच आपल्या करिअरमध्ये ‘प्यार में कभी कभी’, ‘शादी का लड्डू’ आणि ‘एंथनी कौन है’ या सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे. राज कौशलच्या निधनानंतर बॉलिवूडमधील अनेकांनी दुःख व्यक्त केलं आहे.

    लग्नाला होता कुटुंबाचा विरोध
    मंदिरा बेदी आणि राज कौशल यांची पहिली भेट मुकुल आनंद यांच्या घरी झाली होती. मंदिरा तेथे ऑडिशन द्यायला गेली होती. राज मुकुल आनंद यांचे असिस्टंट म्हणून काम पाहत होते. इथूनच दोघांच्या प्रेमाची सुरूवात झाली. मंदिरा बेदीने १४ फेब्रुवारी १९९९ मध्ये राज कौशल यांच्याशी लग्न केलं. या लग्नाला मंदिराच्या पालकांचा विरोध होता. मात्र मंदिराच्या प्रेमापुढेच त्यांचं काहीच चाललं नाही.