fitness and wellness award to shilpa shetty

शिल्पा शेट्टीला ‘फिटनेस अँड वेलनेस आयकॉन ऑफ द डिकेड’(Fitness And Wellness Icon Of The Decade Award To Shilpa Shetty) या पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं आहे.

    अभिनयासोबतच फिटनेस, योगा, स्टाईल आणि सौंदर्यासाठी नेहमीच प्रकाशझोतात राहणाऱ्या शिल्पा शेट्टीच्या(Shilpa Shetty) शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. समाजामध्ये नेहमीच फिटनेसबाबत जागरुकता पसवणाऱ्या शिल्पा शेट्टीला ‘फिटनेस अँड वेलनेस आयकॉन ऑफ द डिकेड’(Fitness And Wellness Icon Of The Decade Award To Shilpa Shetty) या पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं आहे.

    नुकतंच ‘लिवाएको ग्लोबलस्पा फिट अँड फॅब अवार्ड्स २०२१’च्या कार्यक्रमाचे मुंबईमध्ये आयोजन करण्यात आलं होतं. या सोहळ्यात शिल्पाला ‘फिटनेस अँड वेलनेस आयकॉन ऑफ द डिकेड’चा ट्रॅाफी देऊन गौरव करण्यात आला. या सोहळ्याला सिनेसृष्टीसह इतरही विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी हजेरी लावली होती.


    पुरस्कार स्वीकारल्यानंर शिल्पा म्हणाली की, मी नेहमीच सरळ आणि आत्मीय पद्धतीनं जीवन जगण्यावर विश्वास ठेवला आहे. जीवनाविषयी माझ्या मनात समग्र दृष्टिकोन आहे. फिटनेस आपल्या जीवनात खूप महत्त्वाचा असून, आजच्या बदललेल्या जीवनशैलीमध्ये फिट राहण्याचा सोपा मंत्र आहे. यासाठी प्रत्येकानं मेहनत घेण्याची गरज आहे. प्रत्येकाच्या जीवनात योगाचं वेगळं स्थान असणं गरजेचं असल्याचंही शिल्पानं म्हटलं. शिल्पानं नेहमीच फिटनेस आणि स्वास्थसंबंधीत कार्यक्रमांच्या माध्यमातून जनजागरण करण्याचं काम केलं आहे. या सोहळ्यासाठी महेश भूपती आणि तमन्ना यांच्यासह बऱ्याच सेलिब्रिटी उपस्थित होत्या.