allu arjun talking in marathi

‘पुष्पा’ चित्रपटाच्या प्रमोशनच्या (Pushpa Promotion Event) निमित्ताने नुकतंच अल्लू अर्जुनने एका कार्यक्रमाला हजेरी लावली. यावेळी अल्लू अर्जुनने (Allu Arjun Talking In Marathi) चक्क मराठीत संवाद साधला.

    सुपरस्टार अल्लू अर्जुनचा ‘पुष्पा’ (Pushpa) या चित्रपटाचा पहिला भाग प्रदर्शित झाला. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करत आहे. या चित्रपटाच्या प्रमोशनच्या (Pushpa Promotion Event) निमित्ताने नुकतंच अल्लू अर्जुनने एका कार्यक्रमाला हजेरी लावली. यावेळी अल्लू अर्जुनने (Allu Arjun Talking In Marathi) चक्क मराठीत संवाद साधला. याचा एक व्हिडीओही समोर आला आहे.

    अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदाना याचा पुष्पा हा चित्रपट १७ डिसेंबरला प्रदर्शित झाला. हा चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी मुंबईत एका प्रमोशन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला अल्लू अर्जुन, रश्मिका मंदनासह इतर कलाकार उपस्थित होते. यावेळी अल्लू अर्जुन मराठीत बोलल्याचं समोर आलं आहे.

    यावेळी अल्लू अर्जुन जेव्हा उपस्थितांशी संवाद साधायला उठला तेव्हा तो म्हणाला, ‘सगळ्यांना माझा नमस्कार…’ याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. Watch Bollywood नावाच्या एका युट्यूब चॅनलने हा व्हिडीओ शेअर केला आहे. सध्या हा व्हिडीओ प्रचंड चर्चेत आहे.