Amruta Fadanvis

निर्माते पराग भावसार(Parag Bhavsar) ‘फॅारेन रिटर्न अँड वेल सेटल’ (Foreign Return And Well Settle) या चित्रपटाची निर्मिती करण्यात बिझी आहेत.नुकतंच अंधेरी येथील पंचम स्टुडिओमध्ये या चित्रपटातील ‘ज्या मातीवर जन्म आपला, तोच आपला देश...’ हे गाणं ध्वनीमुद्रीत करण्यात आलं आहे. अमृता फडणवीस(Amruta Fadnavis) यांनी हे गीत गायलं आहे.

    परदेशी भूमीवर गेल्यावर आपला देश आणि इथल्या मातीविषयीची ओढ मनात आठवणींचं काहूर माजवते. हिच भावना सिनेरसिकांना ‘फॅारेन रिटर्न अँड वेल सेटल’(Foreign Return And Well Settle) या आगामी मराठी चित्रपटातील एका गाण्यात अनुभवायला मिळणार आहे. काही दिवसांपूर्वीच मुहूर्त झालेल्या ‘फॅारेन रिटर्न अँड वेल सेटल’ या चित्रपटातील महत्त्वाचं गाणं नुकतंच रेकॅार्ड(Song Recording) करण्यात आलं आहे. मागील काही दिवसांपासून टच या बॅनरखाली निर्माते पराग भावसार(Parag Bhavsar) ‘फॅारेन रिटर्न अँड वेल सेटल’ या चित्रपटाची निर्मिती करण्यात बिझी आहेत.

    नुकतंच अंधेरी येथील पंचम स्टुडिओमध्ये या चित्रपटातील ‘ज्या मातीवर जन्म आपला, तोच आपला देश…’ हे गाणं ध्वनीमुद्रीत करण्यात आलं आहे. अमृता फडणवीस यांनी हे गीत गायलं आहे. हे गाणं गीतकार श्रीकृष्ण राऊत यांच्या लेखणीतून आकाराला आलं असून, संगीतकार दिनेश अर्जुना यांनी संगीतबद्ध केलं आहे.

    या गाण्याबद्दल अमृता म्हणाल्या की, गीतकारांनी लिहिलेली शब्दरचना मनाला भिडणारी आहे. ‘ज्या मातीवर जन्म आपला, तोच आपला देश…’ हे शब्दच मनातील भावना व्यक्त करण्यासाठी पुरेसे आहेत. त्यापुढील ‘नकोस विसरू परदेशी तू कधी आपला देश…’ हे शब्द भारतापासून दूर वास्तव्य करणाऱ्या भारतीयांना आपल्या मातीची आठवण करून देणारे आहेत. मनातील भावना अचूक शब्दांच्या सहाय्यानं या गीतात मांडण्यात आल्या असून, संगीतकार दिनेशजी यांनी त्याला सुरेल संगीताचा साज चढवल्यानं हे प्रेरणादायी गीत मनामनात राष्ट्रभक्तीची ज्योत प्रज्ज्वलीत करणारं ठरेल यात शंका नाही. ‘फॅारेन रिटर्न अँड वेल सेटल’ या चित्रपटाच्या टायटलसाठी हे गाणं अगदी अनुरूप असल्याची भावनाही अमृता यांनी व्यक्त केली.