anita date audio book for children

अभिनेत्री अनिता दातेच्या आवाजात आता ‘मिशन मेमरी फेअरी’ (Mission Memory Fairy) या ऑडिओ सिरीजमध्ये एकापेक्षा एक धम्माल गोष्टी बालदोस्तांना ऐकायला मिळणार आहेत. आर्या नाईक यांनी लिहिलेली ‘मिशन मेमरी फेअरी’ ही स्टोरीटेल ॲपवरील (Storytel App) १० भागांची सिरीज बच्चेकंपनीसाठी खास नाताळनिमित्त विशेष भेट (Christmas Gift From Anita Date) आहे.

    छोट्या पडद्यावरील ‘माझ्या नवऱ्याची बायको’ (Majhya Navryachi Bayko) या मालिकेतील राधिका सुभेदार (Radhika Subhedar) उर्फ अभिनेत्री अनिता दातेच्या आवाजात आता ‘मिशन मेमरी फेअरी’ (Mission Memory Fairy) या ऑडिओ सिरीजमध्ये एकापेक्षा एक धम्माल गोष्टी बालदोस्तांना ऐकायला मिळणार आहेत. आर्या नाईक यांनी लिहिलेली ‘मिशन मेमरी फेअरी’ ही स्टोरीटेल ॲपवरील १० भागांची सिरीज बच्चेकंपनीसाठी खास नाताळनिमित्त विशेष भेट (Christmas Gift From Anita Date) आहे. ‘मॅडी’, ‘सारा’, ‘ड्रॅगो’ या बालदोस्तांच्या शौर्याची साहस कथा त्यासोबत ‘डेंजर विच’च्या कारवाया ऐकायला गंमत येणार आहे.

    झी मराठीवरील ‘माझ्या नवऱ्याची बायको’ या मालिकेतून घराघरांत पोहोचलेले नाव म्हणजे अनिता दाते-केळकर. या मालिकेतील नागपुरी ठसक्याच्या राधिका आंटीला पाहताना जशी मज्जा आली अगदी तशीच मज्जा ‘मिशन मेमरी फेअरी’ अनितादीदीच्या आवाजात स्टोरीटेलवर ऐकता येणार आहे.

    मूळची नाशिकची असलेल्या अनिताचं शिक्षण नाशिकच्या सारडा कन्या विद्यामंदिरात झालं. त्यानंतर पुण्यातील ललित कला केंद्रामध्ये तिनं नाट्यशास्त्रात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. ‘एका लग्नाची तिसरी गोष्ट’, ‘दार उघडं ना गडे’, ‘अग्निहोत्र’, ‘मंथन’, ‘अनामिका’, ‘चला हवा येऊ द्या’, ‘जोगवा’, ‘सनई चौघडे’, ‘जोर लागा के हय्या’, ‘अय्या’, ‘गंध’, ‘बालवीर’, ‘आजोबा’ आदी मालिका आणि सिनेमांमधून तिनं मनोरंजन केलं आहे. ‘मिशन मेमरी फेअरी’ या धम्माल सिरीज आवाज देऊन तिनं हे नवीन वर्षाचं गिफ्ट सर्व बच्चेकंपनीला दिलं आहे.