arjun kapoor anshula kapoor and rhea

‘कपूर’ परिवारातील अर्जुन कपूर (Arjun Kapoor), अंशुला कपूर (Anshula Kapoor), रिया कपूर (Rhea Kapoor) आणि करण बुलानी (karan Bulani) कोरोना पॉझिटिव्ह Corona)असल्याचे समोर आले आहे.

    मुंबई : बॉलिवूडमध्ये अनेक सेलिब्रिटींना कोरोनाचा कहर दिसून येत आहे. करीना कपूर खान आणि अमृता अरोरा यांच्यानंतर आता ‘कपूर’ परिवारातील अर्जुन कपूर (Arjun Kapoor), अंशुला कपूर (Anshula Kapoor), रिया कपूर (Rhea Kapoor) आणि करण बुलानी (karan Bulani) कोरोना पॉझिटिव्ह Corona)असल्याचे समोर आले आहे. हे सर्वजण आता घरी क्वारंटाईन आहेत. (Arjun Kapoor, Anshula Kapoor, Rhea Kapoor And Karan Bulani Corona Positive) दरम्यान बोनी कपूर यांचा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे.

    गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये अर्जून कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे समोर आले होते. त्यावेळी त्याने स्वत: सोशल मीडियावर पोस्ट करून याबाबत माहिती दिली होती. मागच्या वेळीही अर्जुनने स्वतःला घरी क्वारंटाईन केले होते. आता पुन्हा त्याला कोरोनाची लागण झाली आहे.

    आज अंशुलाचा वाढदिवस आहे आणि नेमकी आजच ती कोरोना पॉझिटिव्ह असल्याची माहिती समोर आली आहे.
    रिया कपूरने आपण कोरोना पॉझिटिव्ह असल्याची माहिती सोशल मीडियावर दिली आहे. अभिनेत्रीने लिहिले, ‘होय, पूर्ण खबरदारी घेतल्यानंतरही मी कोरोना पॉझिटिव्ह झाले आहे. ही माझी खाजगी बाब आहे, पण मला कळत नाही की, हा इतका मोठा मुद्दा का बनवला जात आहे. ही माहिती फक्त सरकारी आणि मेडिकलशी संबंधित लोकांसाठी आहे, जेणेकरून ते त्यांचे काम करू शकतील, इतर कोणत्याही गॉसिप साईटसाठी नाही.’