sonu sood

रहिवासी इमारतीचे हॉटेलमध्ये रुपांतर करुन(Illegal Hotel Of Sonu Sood) त्यात बेकायदेशीररित्या बांधकाम केल्याप्रकरणी मुंबई महापालिकेने अभिनेता सोनू सूदला(Sonu Sood) नोटीस (BMC Issued Notice To Sonu Sood)पाठवली आहे.

    अभिनेता सोनू सूदला(Sonu Sood) जुहूमधील(Juhu) रहिवासी इमारतीचे हॉटेलमध्ये रुपांतर करुन त्यात बेकायदेशीररित्या बांधकाम केल्याप्रकरणी मुंबई महापालिकेने नोटीस (BMC Issued Notice To Sonu Sood)पाठवली आहे. यापूर्वी १५ नोव्हेंबरला पालिकेकडून सोनूला याबाबत नोटीस(Illegal Hotel) पाठवण्यात आली होती. यावेळी त्याला या हॉटेलचे रुपांतर सहा मजली निवासी इमारतीत करावे, असे सांगण्यात आले होते.

    या वर्षाच्या सुरुवातीला पालिकेने सोनू सूदला एक नोटिस पाठवली होती. यावळी पालिकेने सोनू सूदला त्याच्या जुहू येथील हॉटेलला पुन्हा निवासी इमारतीत रूपांतरित करण्यास आणि इमारतीतील बेकायदेशीर बांधकामे हटवण्यास सांगितले होते. यानंतर सोनूने मुंबई उच्च न्यायालयात स्वत: या इमारतीचे नुतनीकरण करणार असल्याचे सांगितले होते. मात्र, सोनूने अद्याप या इमारतीचे नुतनीकरण केलेले नाही, असे बीएमसीच्या नव्या नोटीसमध्ये नमूद करण्यात आले आहे.

    मुंबई महापालिकेने पाठवलेल्या नुकतंच सोनू सूदला नवीन नोटीस पाठवली आहे. यात दिलेल्या माहितीनुसार, सोनू सूदच्या जुहूमधील रहिवासी इमारतीच्या पहिल्या मजल्यापासून सहाव्या मजल्यापर्यंत राहणे/ खाणे बंद केले आहे. मात्र याचा वापर हा रहिवाशांकरिता केला जाईल, असे सांगण्यात आले होते.

    तसेच तुम्ही यापूर्वी नमूद केले होते की, जोडणी/बदली/पुनर्स्थापनासाठी आवश्यक काम प्रगतीपथावर आहे. मात्र नुकतंच पालिका कार्यालयाने २० ऑक्टोबर २०२१ रोजी जागेची पाहणी केली आहे. मात्र आपण मंजूर आराखड्यानुसार काम सुरू केले नसल्याचे दिसून येत आहे., असे पालिकेने या नोटीसमध्ये नमूद करण्यात आले आहे.

    दरम्यान काही महिन्यांपूर्वी सामाजिक कार्यकर्ते गणेश कुसामुलू यांनी सोनू सूदवर आरोप केले होते. या हॉटेलचे मुलींच्या वसतिगृहात रूपांतर केल्याचा आरोप गणेश कुसामुलू यांनी केला होता. त्यामुळे ही इमारत पाडण्यात यावी. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सोनू सूदने इमारतीचे नूतनीकरण केले आहे. त्यांनी बीएमसीला याबाबत माहिती दिली आहे. या इमारतीत कोणतेही बेकायदेशीर बांधकाम होणार नसल्याचे सोनूने म्हटले आहे.