the kashmir files chinmay mandlekar

चिन्मय मांडलेकर बहुप्रतिक्षीत ‘द काश्मीर फाइल्स’ (The Kashmir Files) मध्ये एरिया कमांडर फारुख मलिक बिट्टाची भूमिका (Chinmay Mandlekar To Play Farukh In The Kashmir Files) साकारताना दिसणार आहे.

    दिग्दर्शक दिग्पाल लांजेकरच्या शिवराज अष्टक या शिवकालीन इतिहासातील सुवर्णपानं उलगडणाऱ्या चित्रपटांच्या मालिकेमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारणारा चिन्मय मांडलेकर इतरही बऱ्याच रूपांमध्ये रसिकांसमोर येणार आहे. लवकरच चिन्मय मांडलेकर बहुप्रतिक्षीत ‘द काश्मीर फाइल्स’ (The Kashmir Files) मध्ये एरिया कमांडर फारुख मलिक बिट्टाची भूमिका (Chinmay Mandlekar To Play Farukh In The Kashmir Files) साकारताना दिसणार आहे.

    अनुपम खेर, मिथुन चक्रवर्ती, पल्लवी जोशी आणि दर्शन कुमार यांनी साकारलेल्या महत्त्वाच्या व्यक्तिरेखांचं लक्षवेधी मोशन पोस्टर लाँच केल्यानंतर, निर्मात्यांनी चिन्मय मांडलेकरच्या आणखी एका वेधक पोस्टरचं अनावरण केलं आहे, जे विचार प्रवृत्त करेल.

    पुष्कर नाथ पंडित यांचा माजी विद्यार्थी ‘बिट्टा’ आता एरिया कमांडर फारुख जनाब आहे. पंडितांपासून मुक्त अशा काश्मीरच्या शोधात, तो काश्मिरी पंडितांचा, विशेषतः पौष्कर कुटुंबाचा नाश करतो. पुढे काय होतं ते हत्या आणि धैर्याची भीषण कथा आहे. ‘द कश्मीर फाइल्स’ या आपल्या शीर्षकाला प्रत्यक्षात उतरवणारी ही एक सत्यकथा आहे, जी काश्मिरी पंडित समुदायाच्या काश्मीर नरसंहारातील पीडित पहिल्या पिढीच्या व्हिडिओ मुलाखतींवर आधारित आहे.

    काश्मिरी पंडितांच्या वेदना, दु:ख, संघर्ष आणि आघात यांचे हे हृदयद्रावक वर्णन असून, लोकशाही, धर्म, राजकारण आणि मानवतेबद्दल डोळे उघडणारं तथ्य आहे. २६ जानेवारीला हा चित्रपट सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे.