darling movie housefull

२५० हून सिनेमागृहांमध्ये ३००० पेक्षा जास्त स्क्रीन्सवर प्रदर्शित झालेला ‘डार्लिंग’(Darling) पाहण्यासाठी लोक गर्दी करत आहेत. ‘डार्लिंग’ला(Darling Movie Show Housefull) मिळणाऱ्या प्रतिसादाचं संपूर्ण श्रेय चित्रपटाच्या टिमनं रसिक मायबाप यांना दिलं आहे.

    मराठी बॅाक्स ऑफिसवर(Box Office) आज ‘डार्लिंग’(Darling)चाच बोलबाला आहे. प्रथमेश परब (Prathamesh Parab)आणि रितिका श्रोत्री (Ritika Shrotri) या ‘टकाटक’ जोडीचा जलवा थिएटरमध्ये पुन्हा पाहायला मिळत आहे. रसिक पुन्हा एकदा प्रथमेश-रितिका यांच्या अफलातून केमिस्ट्रीवर फिदा झाल्यानं संपूर्ण महाराष्ट्रात समीर आशा पाटील(Sameer Asha Patil) दिग्दर्शित ‘डार्लिंग’ या चित्रपटानं अक्षरश: धुमाकूळ घातला आहे. अ स्ट्रेस बस्टर फॅमिली एन्टरटेनर ही ‘डार्लिंग’च्या पोस्टरवर देण्यात आलेली टॅगलाईन मराठी सिनेरसिकांनी खरी ठरवली आहे.

    ‘डार्लिंग’ला मिळणाऱ्या प्रतिसादाचं संपूर्ण श्रेय चित्रपटाच्या टिमनं रसिक मायबाप यांना दिलं आहे. महाराष्ट्रातील काही सिनेमागृहांमध्ये ‘डार्लिंग’च्या गाण्यांवर रसिक अक्षरश: तल्लीन होऊन नाचत असल्याच्या क्लिप्स सोशल मीडियावर व्हायरल झाल्या आहेत. २५० हून सिनेमागृहांमध्ये ३००० पेक्षा जास्त स्क्रीन्सवर प्रदर्शित झालेला ‘डार्लिंग’ पाहण्यासाठी लोक गर्दी करत आहेत. हडपसर, खर्डा, रहाटणी, नारायणगाव, तळेगाव, नाशिक, लातूर, नांदेड, अकलूज, अमरावती, खान्देश, चिंचवड, सोनाई, कामोठे, गोरेगाव, वाळूंज, औरंगाबाद, सिटिप्राईड अभिरूची येथे रविवारी हाऊसफुलचे बोर्ड झळकले.

    प्रथमेश आणि रितिका यांच्या जोडीला निखिल चव्हाणनं साकारलेला राजभाऊही महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील प्रत्येक गावातील काही तरुणांचं प्रतिनिधीत्व करणारा असल्यानं तोदेखील लक्ष वेधून घेत आहे. टायटलवरून जरी हा चित्रपट केवळ प्रेमकथा असल्यासारखा वाटत असला तरी मूळात हा फॅमिली एन्टरटेनर असल्यानं प्रेक्षकांवर मोहिनी घालण्यात यशस्वी होत आहे.