baburao song from ek number movie

आनंद शिंदे यांनी गायलेलं ‘बाबूराव...’ (Baburao Song Out) हे गाणं नुकतंच रसिकांच्या भेटीला आलं आहे. ‘बाबूराव...’ (Baburao Song) हे गाणं प्रथमेश परब (Prathmesh Parab) आणि माधुरी पवार (Madhuri Pawar ) यांच्यावर चित्रीत करण्यात आलं असून, राहुल संजीर यांनी कोरिओग्राफी केली आहे.

    दिग्दर्शक मिलिंद कवडे आणि गायक आनंद शिंदे (Anand Shinde) ही जोडी पुन्हा एकदा एका धमाल गीताच्या निमित्तानं एकत्र आली आहे. मिलिंदच्या ‘एक नंबर’ (Ek Number) या आगामी मराठी चित्रपटासाठी आनंद शिंदे यांनी गायलेलं ‘बाबूराव…’ (Baburao Song Out) हे गाणं नुकतंच रसिकांच्या भेटीला आलं आहे. योगायोग म्हणजे या गाण्याचं लेखन जय अत्रेनं केलं असून, संगीत वरुण लिखतेनं दिलं आहे. यापूर्वी ‘तुझी चिमणी उडाली भुर्रर्र…’ आणि ‘आपला हात जगन्नाथ…’ सारखी सुपरहिट गाणी देणारी ही चौकडी ‘बाबूराव…’ या गाण्याच्या निमित्तानं पुन्हा एकत्र आली आहे.

    संजय छाब्रिया यांच्या एव्हरेस्ट एन्टरटेन्मेंटच्या माध्यमातून ‘एक नंबर’ या चित्रपटाचं संगीत रसिकांपर्यंत पोहोचवण्यात येत आहे. ११ फेब्रुवारीला रिलीज होणाऱ्या ‘एक नंबर’ची निर्मिती महेश धुमाळ, जितेंद्र धुमाळ आणि मिलिंद कवडे यांनी धुमाळ प्रोडक्शनच्या बॅनरखाली आऊट ऑफ द बॉक्स फिल्म्सच्या सहयोगानं केली आहे.

    ‘बाबूराव…’ हे गाणं प्रथमेश परब आणि माधुरी पवार यांच्यावर चित्रीत करण्यात आलं असून, राहुल संजीर यांनी कोरिओग्राफी केली आहे. झी युवा अप्सरा आलीची विनर असलेल्या माधुरीनं आजवर बऱ्याच मालिका आणि चित्रपटांमध्ये अभिनय केला आहे. यात चित्रपटात प्रथमेश परब मुख्य भूमिकेत असून, मिलिंद शिंदे, गणेश यादव, निशा परूळेकर, अभिलाषा पाटील, आयली घिया, ऋषिकेश धामापूरकर, अक्षता पाडगावकर, प्रणाली संघमित्रा ढावरे, सुमित भोक्से, सुनिल मगरे, हरिष थोरात, आकाश कोळी आदी कलाकारही आहेत.