FIR to be filed against Alia Bhatt; BMC will take action for breaking the rules of home quarantine and going to Delhi for promotion of the film

पेंडॅमिक कायद्यांतर्गत, अभिनेत्री आलिया भट हिच्याविरोधात एफआयआर दाखल करण्याची तयारी सुरु आहे. होम क्वारंटाईनचे आदेश मोडले म्हणून आलियाविरोधात एफआयआर दाखल करण्याच्या तयारीत मुंबई महापालिका आहे. आलियाचा कोरोना चाचणीचा रिपोरोट निगेटिव्ह असला तरी, हाय रिस्क संपर्कात असलेल्या व्यक्तींना १४ दिवस क्वारंटाईन राहणे गरजेचे आहे. मात्र ब्रम्हास्त्र सिनेमाच्या प्रमोशनसाठी आलिया भट रणबीर कपूरसोबत दिल्लीला गेली होती(FIR to be filed against Alia Bhatt; BMC will take action for breaking the rules of home quarantine and going to Delhi for promotion of the film).

    मुंबई : पेंडॅमिक कायद्यांतर्गत, अभिनेत्री आलिया भट हिच्याविरोधात एफआयआर दाखल करण्याची तयारी सुरु आहे. होम क्वारंटाईनचे आदेश मोडले म्हणून आलियाविरोधात एफआयआर दाखल करण्याच्या तयारीत मुंबई महापालिका आहे. आलियाचा कोरोना चाचणीचा रिपोरोट निगेटिव्ह असला तरी, हाय रिस्क संपर्कात असलेल्या व्यक्तींना १४ दिवस क्वारंटाईन राहणे गरजेचे आहे. मात्र ब्रम्हास्त्र सिनेमाच्या प्रमोशनसाठी आलिया भट रणबीर कपूरसोबत दिल्लीला गेली होती(FIR to be filed against Alia Bhatt; BMC will take action for breaking the rules of home quarantine and going to Delhi for promotion of the film).

    दिल्ली दौऱ्यात तिने अनेकांच्या भेटीही घेतल्या आहेत, त्यामुळे मुंबई महापालिकेच्या नियमांचा भंग झाला आहे. या प्रकरणी महापालिकेकडून चौकशी सुरु असून, तिने नियम उल्लंघन केल्याचे पुरावे मिळाल्यानंतर तिच्याविरोधात रितसर तक्रार दाखल करण्यात येणार आहे.
    महापालिकेच्या आरोग्य समितीच्या अध्यक्षा राजूल पटेल यांनी आलियाविरोधात तरक्रार दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. ती सर्वसामान्यांसाठी आदर्श असल्याने तिने जबाबदारीने वागायला हवे, नियम सगळ्यांसाठी सारखेच असल्याचे पटेल यांचे म्हणणे आहे.

    आलिया दिल्लीला गेली हे कळाल्यानंतर, महापालिका अधिकाऱ्यांनी तिच्या मॅनेजरशी संपर्क साधला होता. नियमभंग केल्यानंतर आता दिल्लीतच राहावे, मुंबईत येऊ नये, असेही त्यांना सांगण्यात आले होते. मात्र याकडे दुर्लक्ष करत आलिया रात्री उशिरा मुंबईत परतली. त्यामुळे आता आलियाविरोधात पेंडॅमिक कायद्यानुसार तक्रार दाखल करण्यात येणार आहे.

    गेल्या काही दिवसांपासून फिल्ग जगतात अनेक अभिनेते आणि अभिनेत्रींना कोरोनाची लागण झाली आहे. यामुळे महापालिका आणि अधिकारी चिंतेत आहेत. यात सहा जणांचा समावेश आहे. त्यात करिना कपूर, अमृता अरोरा, महीप कपूर, शनाया कपूर, सीमा खान, योहान खान यांचा समावेश आहे.