gangubai kathiawadi

७२व्या बर्लिन इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये स्क्रिनिंगसाठी ‘गंगूबाई काठियावाडी’ची निवड (Gangubai Kathiawadi Selected For Berlin International Film Festival) करण्यात आल्याची बातमी आली आहे. भन्साळींच्या चित्रपटांच्या चाहत्यांसाठी ही आनंदाची बातमी आहे.

    संजय लीला भन्साळींच्या (Sanjay Leela Bhansali) ‘गंगूबाई काठियावाडी’ (Gangubai Kathiawadi) या आगामी चित्रपटाकडं केवळ सिनेरसिकांचंच नव्हे, तर संपूर्ण मनोरंजन विश्वाचं लक्ष लागलेलं आहे. अशातच ७२व्या बर्लिन इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये स्क्रिनिंगसाठी ‘गंगूबाई काठियावाडी’ची निवड (Gangubai Kathiawadi Selected For Berlin International Film Festival) करण्यात आल्याची बातमी आली आहे. भन्साळींच्या चित्रपटांच्या चाहत्यांसाठी ही आनंदाची बातमी आहे.

    फेब्रुवारीमध्ये होणाऱ्या बर्लिन इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये ‘गंगूबाई काठियावाडी’चा वर्ल्ड प्रीमियर होणार आहे. या चित्रपटात आलिया भट्टनं टायटल रोल साकारला असून, अजय देवगणही महत्त्वपूर्ण भूमिकेत आहे. बर्लिनेल स्पेशलचा एक भाग म्हणून ‘गंगूबाई काठियावाडी’ची निवड करण्यात आली आहे, जो चित्रपट महोत्सवाचा एक भाग असून, अनुकरणीय सिनेमा प्रदर्शित करण्यासाठी समर्पित आहे. यंदाच्या फेस्टिव्हलसाठी पेंडॅमिकच्या काळात शूट करण्यात आलेल्या चित्रपटांचा विचार करण्यात आला आहे.

    भन्साळी यंदा सिनेसृष्टीतील २५ वर्षांची कारकीर्द पूर्ण करत आहेत. ‘गंगूबाई काठियावाडी’ हा त्यांचा दहावा चित्रपट असून, त्यांच्यासाठी स्पेशल आहे. भन्साळी म्हणाले की, ‘गंगूबाई काठियावाडी’ची कथा माझ्या हृदयाच्या खूप जवळ आहे. मी आणि माझ्या टिमनं हे स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी मेहनत घेतली आहे. प्रतिष्ठित बर्लिन आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी आमच्या चित्रपटाची निवड झाली असून, तिथं तो प्रदर्शित होणार असल्याचा आम्हाला अभिमान आणि सन्मान वाटतो. १८ फेब्रुवारी रोजी हा चित्रपट रिलीज होणार आहे.