gehraaiyan

‘गहराईयां’मध्ये दीपिका पादुकोण ( Deepika Padukone), सिद्धांत चतुर्वेदी (Siddhant Chaturvedi), अनन्या पांडे (Ananya Pandey), धैर्य कारवा (Dhairya Karwa) प्रमुख भूमिकेत असून सोबत नसिरुद्दीन शहा आणि रजत कपूर महत्त्वाच्या भूमिकेत झळकतील. या सिनेमाचा वर्ल्ड प्रीमियर अमेझॉन प्राईम व्हिडीओवर (Gehraiyaan World Television Premier) २५ जानेवारी २०२२ पासून जगभरात २४० हून अधिक देश आणि प्रदेशांत होणार आहे.

  अमेझॉन प्राईम व्हिडीओच्या (Amazon Prime Video) वतीने आज ‘गहराईयां’च्या (Gehraiyaan) विशेष वर्ल्ड प्रीमियरची घोषणा (Gehraiyaan World Television Premier) करण्यात आली. ‘कपूर अँड सन्स’नंतर शकुन बत्राने (Shakun Batra) दिग्दर्शित केलेल्या या आणखी एका चित्रपटाची प्रेक्षकांना प्रतीक्षा होती.  गुंतागुंतीचे आधुनिक नातेसंबंध, प्रौढता, सोडून देण्याची वृत्ती आणि एखाद्याच्या जीवन मार्गाचे नियंत्रण मिळवण्यावर आधारीत चित्रपट आहे. ‘गहराईयां’ या चित्रपटाचा टीझर नुकताच प्रदर्शित (Gehraiyaan Teaser Release) झाला आहे.

  जोउस्का फिल्म्स समवेत धर्मा प्रॉडक्शन्स आणि वायकॉम १८ स्टुडिओजची ही संयुक्त निर्मिती आहे. ‘गहराईयां’मध्ये दीपिका पादुकोण ( Deepika Padukone), सिद्धांत चतुर्वेदी (Siddhant Chaturvedi), अनन्या पांडे (Ananya Pandey), धैर्य कारवा (Dhairya Karwa) प्रमुख भूमिकेत असून सोबत नसिरुद्दीन शहा आणि रजत कपूर महत्त्वाच्या भूमिकेत झळकतील. या सिनेमाचा वर्ल्ड प्रीमियर अमेझॉन प्राईम व्हिडीओवर २५ जानेवारी २०२२ पासून जगभरात २४० हून अधिक देश आणि प्रदेशांत होणार आहे.

   

  View this post on Instagram

   

  A post shared by amazon prime video IN (@primevideoin)

  “इतक्या वर्षांत आम्ही अमेझॉन प्राईम व्हिडीओत आमच्या ग्राहकांना साजेशा कथा सांगण्यासाठी वचनबद्ध राहिलो” असे अमेझॉन प्राईम व्हिडीओचे हेड ऑफ कंटेंट लायसन्सिंग मनीष मेंघानी यांनी सांगितले. “गहराईयां ही कलाकृती आमच्या ग्राहकांवर नक्कीच छाप सोडून राहील. तिची कथाकथनाची पद्धत सिनेचाहत्यांच्या पसंतीस उतरणार आहे. खरोखर ही कथा खास आहे, शकून बत्राने ती हुशारीने गुंफली आहे. गुंतागुंतीच्या मानवी भावना रंगवण्याची क्षमता त्याने पुन्हा सिद्ध केली. या सिनेमामुळे आमची धर्मा प्रॉडक्शनसोबतची भागीदारी बळकट व्हायला मदत झाली आणि आमच्या जगभरातील ग्राहकांसमोर हृदयस्पर्शी कथा घेऊन येताना मनात उत्साह संचारला आहे.”

  धर्मा प्रॉडक्शन्सचे करण जोहर म्हणाले की, “गहराई हे आधुनिक नातेसंबंधांचं तीव्र, अस्सल आणि प्रामाणिक निरीक्षण आहे आणि शकुनने मानवी भावनांची गुंतागुंत रंगवण्याचे महत्त्वाचे धनुष्य पेलले आहे. त्याला कलाकारांच्या अदाकारीची प्रामाणिक आणि सशक्त जोड मिळाल्याने फिल्मच्या कथेला चांगली पकड आहे. आम्ही अमेझॉन प्राईम व्हिडीओवर गहराईच्या प्रीमियमसाठी उत्सुक आहोत. ही शेरशाहनंतरची आमची दुसरी भागीदारी आहे, कथेचे सूत्र वैश्विक स्तरावर स्वीकारले जाईल अशी सदिच्छा व्यक्त करतो. प्रेम आणि मैत्री विरुद्ध एखाद्याची महत्त्वाकांक्षा, ध्येय आणि संघर्षाची कथा आहे, भारतीय आणि जगभरातील प्रेक्षकांना ती नक्कीच आपलीशी वाटेल.”

  दिग्दर्शक शकुन बत्रा म्हणाले की, “माझ्याकरिता गहराईयां हा केवळ एक सिनेमा नाही. तो मानवी नात्यांचा वैशिष्ट्यपूर्ण प्रवास आहे. आधुनिक प्रौढ नात्यांचा आरसा आहे. आपण भावना आणि मानसिक आंदोलनातून कसा प्रवास करतो, प्रत्येक पाऊल उचलतो, प्रत्येक निर्णय आपल्या आणि अवतीभोवती असलेल्या व्यक्तींच्या जीवनावर कसा परिणाम करणारा ठरतो हे दर्शवतो. अद्वितीय टीम आणि धर्मा प्रॉडक्शनसमवेत या प्रवासात सामील झाल्याबद्दल विशेष आनंद वाटतो, ही कलाकार मंडळी फार प्रतिभावंत आहे आणि आता अमेझॉन प्राईम व्हिडीओची जोड मिळाली आहे. हा सिनेमा प्रेक्षकांना आपलासा वाटेल असे माझे मत आहे. जगभरातील प्रेक्षकांकडून येणाऱ्या प्रतिसादाची मला प्रतीक्षा राहील.