hemangi kavi dancing on govinda song

हेमांगी कवीने (Hemangi Kavi Dhumal) तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन एक व्हिडीओ(Hemangi Kavi Video On Instagram) शेअर केला आहे.या व्हिडीओत हेमांगी ही चक्क अभिनेता गोविंदाच्या गाण्यावर डान्स (Hemangi Kavi Govinda Style Dance) करताना दिसत आहे.

    अभिनेत्री आणि नृत्यांगना हेमांगी कवी धुमाळ(Hemangi Kavi Dhumal) वेगवेगळ्या कारणामुळे नेहमी चर्चेत असते. हेमांगी ही सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते. अनेक फोटो आणि व्हिडीओ ती कायम सोशल मीडियावर (Social Media) शेअर करत असते. नुकतंच हेमांगीने डान्स करतानाचा(Hemangi Dance Video) एक व्हिडीओ शेअर केला आहे. सध्या तिच्या या व्हिडीओची सर्वत्र चर्चा सुरु आहे.


    नुकताच हेमांगीने तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन एक व्हिडीओ(Hemangi Kavi Video On Instagram) शेअर केला आहे.या व्हिडीओत हेमांगी ही चक्क अभिनेता गोविंदाच्या गाण्यावर डान्स(Hemangi Kavi Govinda Style Dance) करताना दिसत आहे. ‘आप के आ जाने से,’ गाण्यावर तिने डान्स केला आहे. यात तिने गोविंदासारखेच कपडे परिधान केले असून ती गोविंदाच्या स्टाईलप्रमाणेच नाचताना दिसत आहे. या व्हिडीओला तिने ‘ऑन पब्लिक डिमांड’ असे कॅप्शन दिले आहे.

    त्यानंतर तिने पुढे ‘आणि मलाही बहाणा हवा होता’, असेही म्हटले आहे. विशेष म्हणजे तिने हा व्हिडीओ गोविंदा यांनाही टॅग केला आहे. तिचा हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडीओवर अनेक जण लाईक्स आणि कमेंट्स करताना दिसत आहे. एका नेटकऱ्याने ‘ताई एक नंबर’ अशी कमेंट केली आहे. तर एकाने ‘छान आहे पण नको मराठीच बरं आपलं’ असे म्हटले आहे. तर एकाने ‘नीलमची आठवण करुन दिली’, अशी कमेंट केली आहे. त्यासोबत काहींनी ‘खूप छान’, ‘खतरनाक’, ‘जबरदस्त’ अशाही कमेंट्स केल्या आहेत.