
मुस्लिमांमध्ये भीती निर्माण करण्याचे प्रयत्न सुरू आहेत; परंतु आम्ही (मुस्लिम) 20 कोटी आहोत. आम्ही घाबरणार नाही तर लढू, असे वादग्रस्त वक्तव्य ज्येष्ठ अभिनेते नसिरुद्दीन शाह यांनी केले आहे. मुघल आक्रमक आणि अत्याचारी नव्हते, तर राष्ट्रनिर्माणमध्ये त्यांचे योगदान मोठे आहे, असेही ते म्हणाले. हरिद्वार येथील धर्मसंसदेतील चिथावणीखोर भाषणांवरून त्यांना एका मुलाखतीत विचारणा केली असता शाह यांनी वादग्रस्त विधान केले(It is falsely said that the Mughals committed atrocities, the Mughals were not oppressors, not aggressors, but nation builders; Controversial statement of actor Nasiruddin Shah).
मुंबई : मुस्लिमांमध्ये भीती निर्माण करण्याचे प्रयत्न सुरू आहेत; परंतु आम्ही (मुस्लिम) 20 कोटी आहोत. आम्ही घाबरणार नाही तर लढू, असे वादग्रस्त वक्तव्य ज्येष्ठ अभिनेते नसिरुद्दीन शाह यांनी केले आहे. मुघल आक्रमक आणि अत्याचारी नव्हते, तर राष्ट्रनिर्माणमध्ये त्यांचे योगदान मोठे आहे, असेही ते म्हणाले. हरिद्वार येथील धर्मसंसदेतील चिथावणीखोर भाषणांवरून त्यांना एका मुलाखतीत विचारणा केली असता शाह यांनी वादग्रस्त विधान केले(It is falsely said that the Mughals committed atrocities, the Mughals were not oppressors, not aggressors, but nation builders; Controversial statement of actor Nasiruddin Shah).
देशात गृहयुद्धाचे वातावरण
देशात एका प्रकारे गृहयुद्धसारखे वातावरण निर्माण केले जात आहे. मुस्लिमांमध्ये भीती निर्माण करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. पण आम्ही 20 कोटी लोक आहोत. जर कोणते अभियान सुरू असेल तर त्याचा जोरदार विरोध होईल आणि लोकांचा संताप बाहेर पडेल. 20 कोटी लोकसंख्येला अशाप्रकारे संपवण्याची भाषा केली जाऊ शकत नाही. कारण आमच्या पिढ्या येथे गेल्या. आमचा जन्म येथे झाला आहे असे नसीरुद्दीन शाह म्हणाले.
मुघलांचा इतिहास गौरवशाली
शाह यांनी मुघलांचे कौतुकही केले. मुघलांनी अत्याचार केले असे खोटे सांगितले जाते. मुघल हे अत्याचारी, आक्रमक नाही, तर राष्ट्रनिर्माता होते. देशासाठी त्यांचे खूप मोठे योगदान असून, ऐतिहासिक स्मारके आणि गौरवशाली इतिहास मुघलांनी दिला आहे. संगीत, नृत्य, चित्रकला याची परंपराही मुघलांनी दिली, असे ते म्हणाले.
शाह उवाच्…
मला तर आता लोकांवर विश्वासच राहिलेला नाही. त्याचे कारण म्हणजे लोकं काय विचार करतील हे सांगता येत नाही. अनेकांना या देशामध्ये धर्माच्या नावावर युद्ध सुरु करायचं आहे. त्यांना याठिकाणी शांतता नको आहे. अनेकांना उगाचच त्रास द्यायला आवडते. त्यांना काही करुन वाद निर्माण करणं हेच ध्येय असते. अशावेळी फार जपून वागण्याची गरज असते. माथेफिरु आपल्याला भडकवात. अशावेळी संयमही महत्वाचा आहे. आम्हीही या देशाचे आहोत हे ऐकुनही आम्हाला विनाकारण त्रास देत असल्यास आम्हीही त्यांचा लढून सामना करु.
मुघल निर्वासित!
“मुघलांनी केलेले अत्याचार हे अनेकदा दाखवले जातात. मात्र आपण हे विसरतो की मुघलांनी आपल्या देशाच्या जडघडणीमध्ये हातभार लावला. त्याच लोकांनी आपल्या देशामध्ये दिर्घकालीन परिणाम करणारी स्मारके उभारलीत, त्यांनी आपल्या देशातील नृत्य, संगीत, चित्रकला, साहित्यासारख्या कलांवर प्रभाव पाडला. हा देशच आपली मातृभूमी करण्याच्या उद्देशाने ते भारतात आलेले. तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही त्यांना निर्वासित म्हणू शकता,”
नेटकऱ्यांनी केले ट्रोल
घुसखोरी करणाऱ्यांबद्दल अशापद्धतीचं बेजबाबदार वक्तव्य का करावं. हे दर्जाहीन वक्तव्य आहे की मुघल हे निर्वासित होते. “त्यांनी त्यांची विचार करण्याची शक्ती गमावली. त्यांना फार गांभीर्याने घेण्याची गरज नाही. आपला देशच कृतघ्न लोकांनी भरलाय आणि ते त्यापैकीच एक आहेत.