baliye re song jersey

‘जर्सी’ (Jersey Movie) चित्रपटाच्या निर्मात्यांनी ‘बलिए रे...’ (Baliye Re Song Out) हे चित्रपटातील एक महत्त्वपूर्ण गाणं रिलीज केलं आहे. साचेत-परंपरा (Sachet Parampara) या संगीतकार जोडीनं हे गाणं कंपोझ केलं आहे. साचेत टंडन आणि स्टेबीन बेन (Stebin) यांनी गायलं आहे. शेली (Shellee) नावानं प्रसिद्ध असलेल्या शैलेंदर सिंग सोढी यांनी हे गाणं लिहीलं आहे. हे रोमँटिक गाणं शाहिद कपूर (Shahid Kapoor)आणि मृणाल ठाकूर ( Mrunal Thakur) यांच्या तारुण्यातील दिवसांमधील असल्याचं चित्रपटात पाहायला मिळणार आहे. ‘जर्सी’  हा चित्रपट ३१ डिसेंबरला रिलीज होणार आहे. याचं दिग्दर्शन राष्ट्रीय पारितोषिक विजेते फिल्ममेकर गौतम तिन्ननुरी यांनी केलं आहे. निर्मितीची जबाबदारी दिल राजू, एस नागा वामसी आणि अमन गिल यांनी सांभाळली आहे.