‘का रं देवा’चे पोस्टर आणि म्युझिक लाँच दिमाखात संपन्न ; आनंद शिंदे म्हणतात “घुमू दे आवाज कानात, वाजू दे डीजे दणक्यात”

सह्याद्री फिल्म प्रॉडक्शनच्या प्रशांत शिंगटे यांनी चित्रपटाची निर्मिती केली आहे. चित्रपटाची कथा आणि दिग्दर्शन रंजीत दशरथ जाधव यांचं आहे. सुशांत माने, तानसेन लोकरे यांनी केलेल्या गीतांना संदीप भुरे यांनी संगीतबद्ध केले आहे. सुप्रसिद्ध गायक आनंद शिंदे, आदर्श शिंदे, मधुर शिंदे, डॉ.नेहा राजपाल, सुप्रिया सोरटे यांच्या सुमधुर आवाजात चित्रपटातील गाणी स्वरबद्ध करण्यात आली आहेत.

  • प्रमुख भूमिकेत झळकणार अभिनेता मयुर लाड

मुंबई : तुझ्यात जीव रंगला, जय मल्हार, विठू माऊली अशा अनेक मालिका, मुंबई डायरीजसारख्या वेब सीरिजद्वारे आपला ठसा उमटवेला अभिनेता मयुर लाड (Mayur Lad) “का रं देवा” (Ka Ra Deva) या चित्रपटात प्रमुख भूमिकेत दिसणार आहे.

अभिनेत्री मोनालिसा बागल (Monalisa Bagal) आणि मयुर लाड यांची जोडी या चित्रपटाचं वैशिष्ट्य असून, चित्रपटाचं नुकतंच म्युझिक (Music) आणि पोस्टर लाँच (Poster Launch) सोहळा सुप्रसिद्ध गायक आनंद शिंदे (Singer Anand Shinde) यांच्या हस्ते संपन्न झाला. याप्रसंगी निर्माते, दिग्दर्शक, कलाकार, गायक आनंद शिंदे आणि तंत्रज्ञ मंडळी आवर्जून उपस्थित होती. “घुमूदे आवाज कानात, वाजू दे डीजे दणक्यात” हे आनंद शिंदे यांच्या आवाजातील धमाकेदार गीतही प्रेक्षकांना ताल धरायला लावणारे आहे.

 

सह्याद्री फिल्म प्रॉडक्शनच्या प्रशांत शिंगटे यांनी चित्रपटाची निर्मिती केली आहे. चित्रपटाची कथा आणि दिग्दर्शन रंजीत दशरथ जाधव यांचं आहे. सुशांत माने, तानसेन लोकरे यांनी केलेल्या गीतांना संदीप भुरे यांनी संगीतबद्ध केले आहे. सुप्रसिद्ध गायक आनंद शिंदे, आदर्श शिंदे, मधुर शिंदे, डॉ.नेहा राजपाल, सुप्रिया सोरटे यांच्या सुमधुर आवाजात चित्रपटातील गाणी स्वरबद्ध करण्यात आली आहेत. एक आदर्शमय प्रेमकथा अशी टॅगलाईन असलेल्या या चित्रपटाचं पोस्टर अतिशय लक्षवेधी आहे.  तसंच चित्रपटाची श्रवणीय गाणीही प्रेक्षकांची नक्कीच पसंती मिळवतील.

अभिनेता मयूर लाडनं वैविध्यपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. टीव्ही मालिका, वेब या माध्यमांमध्ये त्यानं काम केलं आहे. त्याशिवाय आगामी काही चित्रपटातंही मयूर उत्तमोत्तम भूमिकांमध्ये दिसणार आहे. त्याच्या कारकिर्दीत “का रं देवा” हा चित्रपट महत्त्वाचा ठरणार आहे.