
अभिनेत्री कंगना राणौतला जीवे मारण्याची धमकी(Death Threats To kangana Ranaut) देण्यात आल्याचं समोर आलं आहे. सोशल मीडियावरून कंगनाला तशी धमकी(Threatning From Social Media) देण्यात आली आहे.
बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री कंगना राणौतला जीवे मारण्याची धमकी(Death Threats To kangana Ranaut) देण्यात आल्याचं समोर आलं आहे. सोशल मीडियावरून कंगनाला तशी धमकी(Threatning From Social Media) देण्यात आली आहे. आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे आणि ट्विट्समुळे कायमच चर्चेत राहणाऱ्या कंगनाला आता सोशल मीडियावरून जीवे मारण्याची धमकी मिळाल्याने, तिने याप्रकरणी पोलीसात तक्रार दाखल केली आहे. तिने धमकी देणाऱ्याविरोधात फिर्याद नोंदवली आहे.
कंगनाने पोलिसांना सांगितले की, तिला सोशल मीडियावरून एका व्यक्तीने जीवे मारण्याची धमकी दिली आहे. यानंतर कंगनाने मनाली पोलीस स्टेशन गाठून तिथे धमकी देणाऱ्यांच्या विरोधात फिर्याद दिली आहे.
कंगना रनौत ने मनाली पुलिस स्टेशन में एक शिकायत पत्र दिया है जिसमें उन्होंने लिखा कि उनको सोशल मीडिया पर एक व्यक्ति ने जान से मारने की धमकी दी है। पुलिस ने धारा 295 ए, 504, 505, 506, 509 आईपीसी के तहत मामला दर्ज़ किया है: गुरदेव शर्मा, एसपी कुल्लू pic.twitter.com/ZpWIN2Hjzr
— ANI_HindiNews (@AHindinews) November 30, 2021
याबाबत कुल्लूचे पोलीस अधिक्षक गुरदेव शर्मा यांनी माहिती देताना सांगितले की, कंगना रणौतने मनाली पोलीस स्टेशनमध्ये एक तक्रारपत्र दिले आहे, ज्यामध्ये तिने लिहिले की, सोशल मीडियावर एका व्यक्तीने जीवे मारण्याची धमकी दिली आहे. पोलिसांनी कलम २९५ ए, ५०४, ५०५,५०६,५०९ आयपीसी अंतर्गत प्रकरण प्रविष्ट केले आहे.