‘मिस युनिव्हर्स २०२१’ चा किताब जिंकल्यावर हरनाझवर शुभेच्छांचा वर्षाव, कंगनानेही केली खास पोस्ट

चंदीगढच्या हरनाझने ‘मिस युनिव्हर्स २०२१’चा(Miss Universe 2021) ताज जिंकताच तिच्यावर सर्वांनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. दरम्यान, कंगना रणौतने(Kangana Ranaut Post For Miss Universe 2021) केलेल्या पोस्टने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

    ‘मिस युनिव्हर्स २०२१’चा(Miss Universe 2021) किताब जिंकून भारताची हरनाझ संधू (Harnaaz Sandhu)विश्वसुंदरी बनली आहे. जवळपास २१ वर्षांनंतर तिने भारताला हा ताज मिळवून दिला आहे. याआधी २००० साली अभिनेत्री लारा दत्ताने मिस युनिव्हर्सचा किताब जिंकला होता. आता चंदीगढच्या हरनाझने ‘मिस युनिव्हर्स २०२१’चा(Miss Universe 2021) ताज जिंकताच तिच्यावर सर्वांनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. दरम्यान, कंगना रणौतने(Kangana Ranaut Post For Miss Universe 2021) केलेल्या पोस्टने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

    kangana ranaut Reaction

    कंगना ही सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. ती सामाजिक विषयांवर बिनधास्तपणे मत मांडताना दिसते. आता हरनाझने मिस युनिव्हर्स हा किताब जिंकल्यानंतर कंगनाने पोस्ट केली आहे. कंगनाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटच्या स्टोरीला पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये तिने हरनाझचा फोटो शेअर करत ‘खरंच ही आनंदाची बातमी आहे. अभिनंद हरनाझ संधू’ या आशयाचे कॅप्शन दिले आहे.

    कंगनासोबतच इतरही बॉलिवूड अभिनेत्रींनी सोशल मीडिया पोस्टद्वारे हरनाझला शुभेच्छा दिल्या आहेत. हा सर्वच भारतीयांसाठी आनंदाचा क्षण ठरला आहे.