
कबीर खान दिग्दर्शित ‘83’ हा चित्रपट १९८३च्या क्रिकेट विश्वचषकातील(83 World Cup) भारताच्या विजयावर आधारित आहे. रणवीर सिंग(Ranveer Singh) कर्णधार कपिल देव(Kapil Dev) यांची भूमिका साकारत आहे, तर हार्डी संधू गोलंदाज मदन लाल यांच्या भूमिकेत दिसणार आहे.
‘83’ हा चित्रपट(83 Movie Release) रिलीज व्हायला अवघे काही दिवस उरले असल्यानं सर्वांनाच याबाबत उत्सुकता लागली आहे. कबीर खान दिग्दर्शित ‘83’ हा चित्रपट १९८३च्या क्रिकेट विश्वचषकातील(83 World Cup) भारताच्या विजयावर आधारित आहे. रणवीर सिंग(Ranveer Singh) कर्णधार कपिल देव(Kapil Dev) यांची भूमिका साकारत आहे, तर हार्डी संधू गोलंदाज मदन लाल यांच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटात दोघेही १९८३च्या क्रिकेट विश्वचषकातील भारताचा विजय रीक्रिएट करतील. मदनलाल आणि कपिल देव यांचा खास सीन चित्रपटातही रिक्रिएट करुन दाखवण्यात आला आहे.
View this post on Instagram
चित्रपटाच्या प्रमोशनच्या एका कार्यक्रमात कपिल देव यांनी मदन लाल यांच्या रिव्हेंजविषयीचा खुलासा केला. मदन लाल हे १९८३च्या विश्वचषकातील सर्वात प्रभावी गोलंदाज होते.मदनलालच्या बॉलवर रिचर्ड्सकडून तीन चौकार पडले होते तरीही त्यांना गोलंदाजी करायची होती. कपिल देव यांनी त्यावेळी सांगितलं की, “मदीपा तुम्ही थोडा आराम करा. पण त्यांनी ऐकलं नाही. मदन लाल यांनी म्हटलं की मला चेंडू द्या मी रिचर्ड्सला आऊट करणार. मदनलाल यांनी बॉल ओढून घ्यायचा प्रयत्न केला. कपिल देव म्हणाले की, मला भीती वाटत होती. मात्र मदनने स्वत: येऊन चेंडू मागितला त्यामुळे मी तो दिला.” त्यानंतर मदनच्या बॉलवर रिचर्ड्स आऊट झाला. कपिल देव यांनीच तो कॅच घेतला. भारताने फक्त १४० धावांच्या बळावर वेस्ट इंडीजला ऑलआऊट करत पहिल्यांदा वर्ल्ड कप जिंकला.
रणवीर-हार्डीसोबत ताहिर राज भसीन, जीवा, साकिब सलीम, जतिन सरना, चिराग पाटिल, दिनकर शर्मा, निशांत दहिया, साहिल खट्टर, अम्मी विर्क, आदिनाथ कोठारे, धैर्य करवा, आर बद्री आणि पंकज त्रिपाठी देखील महत्त्वाच्या भूमिका आहेत. दीपिका पदुकोण यात कपिल यांची पत्नी रोमीची व्यक्तिरेखा साकारणार आहे. हा चित्रपट २४ डिसेंबरला हिंदी, तमिळ, तेलुगू, कन्नड आणि मलयाळम मध्ये थ्रीडी रिलीज होणार आहे.