kareena kapoor and taimur

लाडक्या मुलाच्या वाढदिवसानिमित्त करीनाने तैमूरच्या लहानपणीच्या आठवणींना उजाळा देण्यात आला आहे . तैमूरने जेव्हा पहिल्यांदा चालायला सुरुवात केली होती तेव्हाचा एक व्हिडीओ करीनाने इन्स्टाग्रामवर (Kareena Kapoor Shared  Thorowback Video Of Taimur) शेअर केला आहे.

    बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूरला कोरोनाची लागण (Kareena Kapoor Corona Positive) झाल्याने सध्या ती विलगीकरणात आहे. करीना कपूर खान आणि सैफ अली खानचा मुलगा तैमूर अली खानचा आज पाचवा वाढदिवस (Taimur Ali Khan’s Fifth Birthday) आहे. पण कोरोनामुळे तिला तिच्या मुलाचा वाढदिवस साजरा करता येणार नाही. दरम्यान लाडक्या मुलाच्या वाढदिवसानिमित्त करीनाने तैमूरच्या लहानपणीच्या आठवणींना उजाळा देण्यात आला आहे . तैमूरने जेव्हा पहिल्यांदा चालायला सुरुवात केली होती तेव्हाचा एक व्हिडीओ करीनाने इन्स्टाग्रामवर (Kareena Kapoor Shared  Thorowback Video Of Taimur) शेअर केला आहे.

    करीनाने शेअर केलेला हा व्हिडीओ तो पहिल्यांदा चालायला शिकला त्यादरम्यानचा आहे. करीनाने शेअर केलेल्या व्हिडीओत तैमूर चालत असतानाच अचानक अडखळतो आणि त्यानंतर तो पडतो, असे या व्हिडीओत दिसत आहे.

    हा व्हिडीओ शेअर करताना करीनाने कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, “तुझे पहिलं पाऊल, पहिल्यांदा धडपडणं… या सर्व गोष्टी मी अभिमानाने रेकॉर्ड केल्या आहेत. माझ्या प्रिय मुला, हे नक्कीच तुझे पहिले आणि शेवटचे धडपडणे नक्कीच नाही. पण मी हे सर्व खात्रीने सांगू शकतो की तू उठून स्वत:ची काळजी घेशील. तू निश्चित पुढे जाशील आणि ताठ मानेने जगशील. कारण तू माझा वाघ आहेस. माझ्या हृदयाचे ठोके असलेल्या तैमूरला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, माझा टिम टिम… तुझ्यासारखा कोणीही नाही, ”असेही करीनाने म्हटले आहे.

    कोरोनाची लागण झाल्यामुळे पहिल्यांदाच तैमूरच्या वाढदिवशी करीना त्याच्यापासून दूर आहे. त्यामुळे ती तिच्या मुलांची फार आठवण काढत असल्याचे दिसत आहे. विशेष म्हणजे करीनाने यावेळी इन्स्टाग्रामवर स्टोरी टाकत रागही व्यक्त केला आहे. “कोविड मी तुझा तिरस्कार करते. मला माझ्या बाळांची आठवण येतेय. पण…आम्ही लवकरच पुन्हा भेटू”, असे तिने इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये म्हटले आहे.