Lalit Prabhakar

अभिनेता ललित प्रभाकर (Lalit Prabhakar In New Role)लवकरच आणखी एका वेगळ्या रूपात झळकणार असल्याची माहिती मिळाली आहे. आता ललितची जोडी दिग्दर्शक वैभव पंडित (Vaibhav Pandit) यांच्यासोबत जमली आहे. अद्भुत क्रिएटिव्हजनं ब्रँड कॉटनकिंगसाठी कमर्शियल फिल्मची निर्मिती केली आहे.

    ‘शांतीत क्रांती’ (Shantit Kranti) या बहुचर्चित वेब सिरीजनंतर सध्या ‘मीडियम स्पायसी’, ‘झोंबिवली’, ‘कलरफूल’ आणि ‘तारी’ या मराठी चित्रपटांमुळं चर्चेत असलेला अभिनेता ललित प्रभाकर (Lalit Prabhakar In New Role)लवकरच आणखी एका वेगळ्या रूपात झळकणार असल्याची माहिती मिळाली आहे.

    ‘आनंदी गोपाळ’च्या माध्यमातून राष्ट्रीय पुरस्कारावर आपली मोहोर उमवरणाऱ्या ललितनं रंगभूमी, टीव्ही, वेब सिरीज आणि सिनेमा अशा विविध प्लॅटफॉर्मवर विविधांगी भूमिका साकारल्या आहेत. आता ललितची जोडी दिग्दर्शक वैभव पंडित यांच्यासोबत जमली आहे. अद्भुत क्रिएटिव्हजनं ब्रँड कॉटनकिंगसाठी कमर्शियल फिल्मची निर्मिती केली आहे.

    वैभव पंडित यांच्यासोबत कामाच्या अनुभवाविषयी ललित म्हणाला की, माझा चित्रपट असो, नाटक असो किंवा वेब सीरिज असो, मी नेहमी १०० टक्के प्रयत्न करतो. शूटिंग करतानाचा माझा अनुभव खूप अनोखा होता. व्यग्र वेळापत्रक, मोठा क्रू, पूर्णपणे व्यावसायिक स्टाफ आणि तरीही टीम सर्वकाही अतिशय आरामदायक करत होती. आम्ही कुठेही तडजोड केलेली नसल्याचंही तो म्हणाला.

    पंडित म्हणाले की, ललितसोबत चित्रीकरण करण्याचा अनुभव खूप मनोरंजक होता. जरी तो मराठी इंडस्ट्रीतील एक मोठा स्टार असला तरी, तो त्याच्या विनोदी वन-लाइनरसह संपूर्ण क्रूला खूप हसवत आणि कम्फर्टेबल ठेवायचा.